जुन्नर (वार्ताहर) – जयहिंद शैक्षणिक संकुलाचे संस्थापक स्व. तात्यासाहेब गुंजाळ यांच्या जयंतीनिमित्त जयहिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरींग, कुरण येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना जयहिंद अभियांत्रिकी महाविद्यालय, जयहिंद पॉलीटेक्निक, जयहिंद कॉलेज ऑफ फार्मसी,जयहिंद इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजममेंट ऍन्ड रिसर्च व आनंद ऋषीजी ब्लड बँक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबीरात १२३ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या शिबिराचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, सुरत वाला फाउंडेशनचे सुनील खताळ, डॉ शिल्पा, विनायक बिराजदार तसेच एचडीएफसी बँकेचे दिनकर वाळके,विकास विधाटे, अमोल ढमाले, यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दत्तात्रय गल्ले,प्राचार्य डॉ. अमोल उबाळे,प्राचार्य डॉ. तेजस पाचपुते,प्राचार्य डॉ. स्वप्निल पोखरकर ,प्राचार्य डॉ विश्वजीत थिगळे, प्राचार्य सुभाष आंद्रे त्याचप्रमाणे सर्व कर्मचारी उपस्थित होते.याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेऊन शिबिर यशस्वी केले.











