अंमळनेर प्रतिनिधी: जाधववाडी ग्रामपंचायतीअंतर्गत बोर्गस घरकुल, मस्टर व इतर विकासकामांमध्ये अनियमितता झाल्याचा आरोप करत संबंधित कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात पंचायत समिती पाटोदा येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात सन २०२४ ते २०२६ या कालावधीत घरकुल व मस्टरच्या कामांमध्ये जॉब कार्डचा वापर न करता तसेच दुसऱ्यांची नावे वापरून कामे दाखविल्याचा आरोप करण्यात आला आहे. बोर्गस घरकुल, मस्टर व इतर कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा संशय व्यक्त करत या सर्व कामांची सखोल चौकशी करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
संबंधित कामांची प्रत्यक्ष तपासणी करून कागदपत्रांची पडताळणी करावी आणि अनियमितता आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने लक्ष घालून पारदर्शक चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.










