पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण व त्रिशरण-पंचशील ग्रहण; बालवक्त्यांनी मांडले भगवान बुद्धांचे विचार
आंबेसांगवी : येथील बौद्ध वाड्यात ७० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला गावातील ज्येष्ठ नागरिक, मान्यवर तसेच बौद्ध वाड्यातील लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेकांनी उपस्थिती लावली.
कार्यक्रमाची सुरुवात गावातील ज्येष्ठ नागरिक हिरामण टोपाजी वाघमारे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करून करण्यात आली. त्यानंतर नामदेव शंकर सूर्यवंशी यांच्या हस्ते निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर उपस्थितांनी त्रिशरण व पंचशील ग्रहण करून भगवान गौतम बुद्धांच्या विचारांप्रती आदर व्यक्त केला.
कार्यक्रमात लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींसाठी भाषणांचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संघर्ष प्रकाश सूर्यवंशी, यश शिवानंद सूर्यवंशी, धनश्री प्रकाश सूर्यवंशी, सार्थक प्रभाकर सोनवणे आणि वंश संदीप सोनवणे यांनी आपल्या भाषणांतून धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे महत्त्व आणि भगवान गौतम बुद्धांचे विचार मांडले. या उपक्रमातून नव्या पिढीला बुद्धांच्या शिकवणीची ओळख करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी धम्मचक्र प्रवर्तन दिन समितीचे अध्यक्ष बुद्धभूषण मोहन वाघमारे आणि उपाध्यक्ष दीपक चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह अंजली वाघमारे, निकिता सूर्यवंशी, अंकिता सूर्यवंशी, साक्षी सूर्यवंशी, आशिष वाघमारे, आदित्य वाघमारे, प्रतीक्षा वाघमारे, बाबासाहेब सूर्यवंशी, अशोक वाघमारे, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश दिवशे, भानुदास वाघमारे, सिद्धार्थ सूर्यवंशी, मोहन वाघमारे, दशरथ सूर्यवंशी, उत्तम सूर्यवंशी, संदीप सोनवणे, शंकर सोनवणे, सुरेश वाघमारे आणि बालाजी डुबे यांनी सहकार्य केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहेबराव सूर्यवंशी यांनी केले, तर रमेशजी वाघमारे यांनी आभार मानले.
भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि करुणेच्या विचारांचा जागर करत आंबेसांगवी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमातून बुद्धांच्या विचारांचे महत्त्व पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला.










