लकी ड्रॉद्वारे महिलांना साड्या, भेटवस्तू व ब्लाउज पीसचे वाटप; सहकार्य करणाऱ्यांचा सन्मान
आजरा प्रतिनिधी :
हरपवडे : येथील श्री रासाईदेवी मंदिरात श्री रासूबाई देवस्थान समितीच्या वतीने महाआरती आणि विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला मंदिराचे पुजारी, देवस्थान समितीचे अध्यक्ष व सदस्य, गावातील ५२ महिला, शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थिनी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
महाआरतीनंतर आयोजित लकी ड्रॉद्वारे दोन महिलांना मानाच्या साड्या, दहा महिलांना भेटवस्तू, तर अन्य महिलांना ब्लाउज पीसचे वाटप करण्यात आले. मानाच्या साड्या व ब्लाउज पीससाठी देवस्थान समिती, सरपंच सागर पाटील आणि ग्रामस्थांनी सहकार्य केले. दहा भेटवस्तू उमा संकपाळ, दत्तात्रय गुरव आणि शेखर पाटील यांच्याकडून देण्यात आल्या.
मंदिरासाठी लाईट आणि साउंड सिस्टीम उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल मारुती जाधव आणि सतीश लटम यांचा सत्कार करण्यात आला. महिलांसाठी संगीत खुर्ची स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक रवींद्र मस्कर सर आणि रोहित पाटील यांनी केले. श्री रासूबाई देवस्थान स्थानिक व्यवस्थापन सल्लागार उपसमिती, हरपवडे यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक कार्यक्रमासोबतच महिलांसाठी मनोरंजनात्मक उपक्रम राबविल्याने उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.







