कला, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग, समाजसेवा, शिक्षण आणि शेती क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव
प्रतिनिधी :
शिर्डी : शिर्डी येथे ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. माऊली कला आणि कल्याणकारी बहुउद्देशीय सामाजिक संस्था व काशिनाथ आव्हाड फिल्म प्रोटेक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, २७ डिसेंबर २०२६ रोजी हा सोहळा पार पडणार आहे.
कला, क्रीडा, पत्रकारिता, उद्योग, समाजसेवा, शैक्षणिक क्षेत्र, महिला समाजकार्य आणि शेती अशा विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांना ‘महाराष्ट्र साई कला भूषण पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष काशिनाथ आव्हाड यांनी दिली.
विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या गुणवंत व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे, त्यांच्या योगदानाचा सन्मान करणे आणि त्यांना पुढील कार्यासाठी प्रोत्साहन देणे हा या पुरस्कार सोहळ्यामागील उद्देश आहे. या कार्यक्रमामुळे सामाजिक, सांस्कृतिक आणि विविध व्यावसायिक क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानाचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
या सोहळ्यासाठी जागा मर्यादित असल्याने प्रथम संपर्क साधणाऱ्यांना प्राधान्य दिले जाणार असल्याचे आयोजकांनी कळविले आहे. इच्छुकांनी अधिक माहितीसाठी आणि संपर्कासाठी खालील व्हॉट्सॲप क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.











