• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

सातपुडा साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ; जुन्या कारखान्याचा उपपदार्थ प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचे नियोजन

शहादा, दि. २३ (का. प्र.) : तालुक्यातील पुरुषोत्तमनगर येथे ओंकार शुगर अँड अलाईड लिमिटेड (सातपुडा साखर कारखाना) यांच्या गळीत हंगामाचा शुभारंभ बॉयलर अग्निप्रदीपन आणि मोळीपूजनाने उत्साहात पार पडला. यावेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना गतहंगामासाठी प्रतिटन ३,०५० रुपये दर देण्यात येणार असून, दिवाळीनिमित्त २५ ऑक्टोबरपासून ऊस उत्पादकांना मोफत साखर वाटप सुरू करण्यात येईल, अशी घोषणा ओंकार ग्रुपचे चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील यांनी केली. चालू हंगामातही जिल्ह्यातील सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

RelatedPosts

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दीपकभाई पुरुषोत्तम पाटील होते. यावेळी आमदार राजेश पाडवी, माजी जिल्हा परिषद सदस्या जयश्रीताई दीपक पाटील, नगरपरिषदेच्या उपाध्यक्षा माधवीताई मकरंद पाटील, पुरुषोत्तमनगरच्या सरपंच कोकिळाताई अशोक पाटील, समूहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तेजस्विनी बर्गे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी, शेतकरी आणि कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिटन ३,०५० रुपये दर; मोफत साखर वाटप

शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना बाबुराव बोत्रे पाटील यांनी सांगितले की, गतहंगामात प्रतिटन २,९५० रुपये दर देण्यात आला होता. त्यात दिवाळीनिमित्त प्रतिटन १०० रुपयांची भर घालण्यात येणार असून, ही अतिरिक्त रक्कम २५ ऑक्टोबरनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. त्यामुळे एकूण दर प्रतिटन ३,०५० रुपये होईल. याशिवाय प्रत्येक ऊस उत्पादक शेतकऱ्याला दिवाळीनिमित्त मोफत साखर दिली जाणार आहे. साखरेच्या बाजारमूल्याचाही विचार केल्यास शेतकऱ्यांना मिळणारा एकूण लाभ प्रतिटन सुमारे ३,१०० रुपयांपेक्षा अधिक ठरत असल्याचा दावा व्यवस्थापनाने केला.

कारखान्याच्या आर्थिक अडचणी दूर झाल्याचा दावा

कारखान्यावर पूर्वी सुमारे २,२०० कोटी रुपयांचे कर्ज होते. अध्यक्ष दीपकभाई पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे सुमारे तीन महिन्यांपूर्वी हे प्रकरण १२० कोटी रुपयांत सामोपचाराने मिटवण्यात यश आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. त्यामुळे कारखाना आर्थिक आणि कायदेशीर अडचणींतून बाहेर पडण्यास मदत झाल्याचेही स्पष्ट करण्यात आले.

बंद असलेला जुना सातपुडा साखर कारखाना आणि उपपदार्थ प्रकल्प पुढील तीन ते चार महिन्यांत सुमारे १० कोटी रुपये खर्च करून पुन्हा कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

कामगारांना २० टक्के पगारवाढ

कामगारांच्या हितासाठी गेल्या दोन महिन्यांपूर्वी सर्व कर्मचाऱ्यांना २० टक्के पगारवाढ लागू करण्यात आल्याचे व्यवस्थापनाने सांगितले. मागील हंगामात तांत्रिक अडचणींमुळे ऊस बिलांच्या देयकांना काही काळ विलंब झाला होता. त्याबद्दल व्यवस्थापनाने दिलगिरी व्यक्त करत चालू हंगामात शेतकऱ्यांची बिले वेळेत अदा करण्याची ग्वाही दिली. तसेच सोशल मीडियावर कारखान्याबाबत प्रसारित होणाऱ्या दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ आणि क्लिप्सवर विश्वास ठेवण्यापूर्वी त्यांची सत्यता पडताळून पाहावी, असे आवाहन करण्यात आले.

जुन्या सभासदांच्या ठेवी परत करण्याची ग्वाही

अध्यक्षीय मनोगतात दीपकभाई पाटील यांनी कारखान्याकडे ठेवी असलेल्या सभासदांना तसेच कारखान्याकडून रक्कम येणे बाकी असलेल्या व्यक्तींना त्यांची रक्कम १०० टक्के अदा केली जाईल, असे आश्वासन दिले. शेतकरी हा कारखान्याचा कणा असून कारखान्याची प्रगती झाल्यास परिसराच्या विकासालाही चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले.

ओंकार ग्रुपच्या उद्योगविस्ताराची माहिती देताना समूहाकडे देशभरात ३४ साखर कारखाने, २३८ केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी आणि २६० मेगावॅट वीज निर्मिती क्षमता असल्याचे सांगण्यात आले. समूहाशी ३१ हजार कर्मचा

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक

Next Post

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

Related Posts

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
ताज्या घडामोडी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
1

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
ताज्या घडामोडी

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 23, 2026
26
ताज्या घडामोडी

माणगावच्या दुर्गेश डांगळे यांचे साहसी यश; गोरखगड ते आहुपे घाट सोलो रेंज ट्रेक यशस्वी

October 23, 2026
37
शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”
ताज्या घडामोडी

शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”

October 23, 2026
3
Next Post
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

ताज्या बातम्या

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In