• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 23, 2026
in ताज्या घडामोडी
0
शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

कथित ‘वोट चोरी’विरोधात आंदोलन; वनपट्टे, शेतकरी कर्जमाफी आणि स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्नही ऐरणीवर

शहादा, दि. २३ (प्रतिनिधी) : कथित ‘वोट चोरी’च्या विरोधात तसेच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरात काँग्रेस पक्षाच्या वतीने गुरुवारी भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चात काँग्रेसचे वरिष्ठ पदाधिकारी, माजी मंत्री, खासदार, पक्षाचे कार्यकर्ते आणि हजारो नागरिक सहभागी झाले होते.

RelatedPosts

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक

शहरातील महात्मा फुले स्मारकाला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. हातात काँग्रेसचे तिरंगी झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन सहभागी कार्यकर्त्यांनी सरकार व प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शहरातील प्रमुख मार्गावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकमार्गे हा मोर्चा प्रांत कार्यालयावर धडकला. यावेळी परिसर घोषणांनी दुमदुमून गेला होता.

प्रांत कार्यालयासमोर झालेल्या सभेत काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सरकारच्या धोरणांवर टीका केली. त्यानंतर विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनाला सादर करण्यात आले.

मोर्चादरम्यान काँग्रेस नेत्यांनी देशात आणि राज्यात लोकशाही व निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न उपस्थित केले. कथित ‘वोट चोरी’च्या प्रकरणांची दखल घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.

याशिवाय नंदुरबार जिल्ह्यातील नागरिक, शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या प्रश्नांकडेही सरकारचे लक्ष वेधण्यात आले. वर्षानुवर्षे जल, जंगल आणि जमिनीवर हक्क असलेल्या वनपट्टेधारकांना अधिकृत वनपट्टे तातडीने देण्यात यावेत, नैसर्गिक आपत्ती व दुष्काळामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देऊन सरसकट कर्जमाफी करावी, तसेच जिल्ह्यातील स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून त्यांचे स्थलांतर थांबवावे, अशा प्रमुख मागण्या निवेदनातून करण्यात आल्या.

“लोकशाहीचे रक्षण आणि नागरिकांच्या हक्कांसाठी काँग्रेस सनदशीर मार्गाने लढा देत राहील. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास यापुढे आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन उभारण्यात येईल,” असा इशारा काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी दिला.

या मोर्चात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दीपक पटेल, माजी मंत्री अॅड. पद्माकर वळवी, अॅड. के. सी. पाडवी, खासदार अॅड. गोवाल पाडवी, युवक काँग्रेसचे निलेश पाटील, दिलीप नाईक, सुहास नाईक, अकलाख अन्सारी यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि हजारो नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Ad 1
Tags: Netradipak Kuwar
Previous Post

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

Related Posts

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण
ताज्या घडामोडी

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
1
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा
ताज्या घडामोडी

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026
0
धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक
ताज्या घडामोडी

धम्म मेळाव्यात पातूरच्या भीमशक्ती व्यायामशाळेची बाजी; लाठी-काठी प्रात्यक्षिकात प्रथम क्रमांक

October 23, 2026
1
सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू
ताज्या घडामोडी

सोरटेवाडीत भरधाव चारचाकीची धडक; मुरूमच्या ५५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू

October 23, 2026
26
ताज्या घडामोडी

माणगावच्या दुर्गेश डांगळे यांचे साहसी यश; गोरखगड ते आहुपे घाट सोलो रेंज ट्रेक यशस्वी

October 23, 2026
37
शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”
ताज्या घडामोडी

शिवडाव–पाटगाव पुलाची दुरवस्था; ग्रामस्थांचा संतप्त सवाल, “प्रशासन आणखी किती अपघातांची वाट पाहणार?”

October 23, 2026
3

ताज्या बातम्या

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

शहाद्यात काँग्रेसचा भव्य जनआक्रोश मोर्चा; मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी

October 23, 2026
शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

शहाद्यात जनहिताच्या मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे तिरंगा लाक्षणिक उपोषण

October 23, 2026
ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

ऊस उत्पादकांना जिल्ह्यातील सर्वाधिक दर; ओंकार ग्रुपतर्फे मोफत साखर वाटपाची घोषणा

October 23, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In