• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

तळई–उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 25, 2026
in ताज्या घडामोडी
0
तळई–उत्राण मार्गावर भीषण अपघात; ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

समोरून येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटीची दुचाकीला धडक; दुसरा वाहनचालकही गंभीर जखमी

एरंडोल | प्रतिनिधी :

RelatedPosts

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

झोनस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोथळी खुर्दच्या मुलींची दमदार कामगिरी; हॉलीबॉलमध्ये विजयी सलामी!

एरंडोल तालुक्यातील कासोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तळई–उत्राण मार्गावर २३ ऑक्टोबर रोजी रात्री भीषण अपघात झाला. समोरून येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटीने दुचाकीला धडक दिल्याने तळई येथील ३६ वर्षीय विलास पाटील यांचा मृत्यू झाला. या अपघातात इलेक्ट्रिक स्कूटीवरील चालकही गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तळई येथील सावता मंदिरासमोरील रस्त्यावर रात्री सुमारे साडेनऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. विलास पाटील हे आपल्या लाल रंगाच्या प्लॅटिना दुचाकीवरून घरी जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या इलेक्ट्रिक स्कूटीने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. धडक जोरदार असल्याने विलास पाटील रस्त्यावर पडले आणि गंभीर जखमी झाले.

अपघातानंतर गावातील नागरिकांच्या मदतीने त्यांना भडगाव येथील अंजनी हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रात्री साडेदहाच्या सुमारास डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, इलेक्ट्रिक स्कूटीवरील तामस्वरे हेदेखील गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी विलास पाटील यांचे मोठे भाऊ योगेश पाटील (वय ३९, रा. तळई) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कासोदा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

विलास पाटील यांच्या निधनामुळे तळई परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.

Ad 1
Tags: Vivek Mahale
Previous Post

काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

Next Post

मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

Related Posts

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न
ताज्या घडामोडी

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

October 25, 2026
1
मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन
ताज्या घडामोडी

मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

October 25, 2026
0
झोनस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोथळी खुर्दच्या मुलींची दमदार कामगिरी; हॉलीबॉलमध्ये विजयी सलामी!
ताज्या घडामोडी

झोनस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोथळी खुर्दच्या मुलींची दमदार कामगिरी; हॉलीबॉलमध्ये विजयी सलामी!

October 24, 2026
17
विहाळ ग्रामपंचायतीची साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई; १४.९३ लाखांच्या थकबाकीसाठी अंतिम नोटीस
ताज्या घडामोडी

विहाळ ग्रामपंचायतीची साखर कारखान्यावर जप्तीची कारवाई; १४.९३ लाखांच्या थकबाकीसाठी अंतिम नोटीस

October 24, 2026
5
शकुंतला रेल्वे स्थानकावर सामाजिक उपक्रमांतून साजरा होणार दीपोत्सव
ताज्या घडामोडी

शकुंतला रेल्वे स्थानकावर सामाजिक उपक्रमांतून साजरा होणार दीपोत्सव

October 24, 2026
5
ताज्या घडामोडी

श्रीवर्धन तालुक्यातील पाणीटंचाईवर तातडीने उपाययोजना करा; अविनाशभाई कोळंबेकर यांचे प्रशासनाला आवाहन

October 24, 2026
4
Next Post
मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

ताज्या बातम्या

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

October 25, 2026
भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

October 25, 2026
मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

October 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In