• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 25, 2026
in Blog
0
मेहकर शहरातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विजयादशमीनिमित्त पथसंचलन
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

“विजयादशमी हे सज्जनशक्तीच्या जागरणाचे पर्व” — श्रीनिवास बेडेकर; पंच परिवर्तन आणि कुटुंब प्रबोधनाचा विचार आचरणात आणण्याचे आवाहन

मेहकर | प्रतिनिधी

RelatedPosts

वीज कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न ऐरणीवर; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयादशमी उत्सवानिमित्त मेहकर शहरातून पथसंचलन काढण्यात आले. या पथसंचलनाचे शहरात ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले. यानंतर आयोजित कार्यक्रमात श्रीनिवास बेडेकर यांनी विजयादशमीचे महत्त्व विशद करताना, “विजयादशमी हे सज्जनशक्तीच्या जागरणाचे आणि असुरी शक्तींवर विजय मिळविण्याचे पर्व आहे,” असे प्रतिपादन केले.

बेडेकर म्हणाले की, भारतीय संस्कृती अनादी काळापासून अखंडपणे पुढे चालत आली आहे. समाज जेव्हा आपली मूल्ये आणि संस्कार विसरतो, तेव्हा विघातक प्रवृत्तींना बळ मिळते. अशा परिस्थितीत समाजातील सज्जनशक्तीचे जागरण करून त्यावर विजय मिळविण्याची परंपरा भारताच्या इतिहासात दिसून येते. भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी सामान्य जनतेमध्ये जागृती निर्माण करून विजय मिळविला.

याच विचारातून परमपूजनीय डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना करून शाखेच्या माध्यमातून व्यक्तिनिर्माणाचे कार्य सुरू केले. मन, मनगट आणि मस्तिष्क यांना संस्कारित करून स्वयंसेवकांमध्ये समाजसेवेची भावना निर्माण करण्यावर संघाचा भर असल्याचे त्यांनी सांगितले. समाजातील चांगल्या शक्तींना एकत्र आणून देशसेवेचे कार्य पुढे नेण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.

संघाच्या पंच परिवर्तनाच्या विचारांच्या आधारे संस्कार जपत समाजाने पुढे वाटचाल करावी, असे आवाहन त्यांनी केले. आधुनिक काळात समाजमाध्यमांवर विविध प्रकारचे विचार आणि कथन प्रसारित होत असताना स्वयंसेवकांनी सतत विवेकबुद्धी जागृत ठेवून समाजात योग्य जाणीव निर्माण करण्याचे कार्य करावे, असेही ते म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुदेश लोढे उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात संघाच्या पंच परिवर्तनाच्या विचारांचा समाजाने स्वीकार करावा, असे मत व्यक्त केले. विशेषतः कुटुंब प्रबोधनाला महत्त्व देत कुटुंबातील संस्कार जपल्याने समाज अधिक सुदृढ होऊ शकतो, असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगर कार्यवाह अॅड. इंद्रजीत सावजी यांनी केले. प्रा. गणेश सावजी यांनी सुभाषित, तर प्रा. प्रवीण जोशी यांनी अमृतवचन सादर केले. केशव बाजड यांनी सांघिक गीत घेतले. कार्यक्रमात दंडाची प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली.

विजयादशमी उत्सवानिमित्त काढण्यात आलेल्या पथसंचलनाला शहरातील नागरिकांचा प्रतिसाद लाभला. विविध ठिकाणी नागरिकांनी पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे स्वागत केले.

Ad 1
Tags: Hemantkumar Biyani
Previous Post

मेहकर येथे श्री रेणुका माता नवरात्र उत्सव समितीतर्फे महाप्रसादाचे आयोजन

Next Post

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

Related Posts

Blog

वीज कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न ऐरणीवर; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

October 25, 2026
0
भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!
Blog

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

October 25, 2026
2
काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न
Blog

काटाळे शेतकरी सहकारी संस्थेचा दापोली येथे शेतकरी अभ्यास दौरा उत्साहात संपन्न

October 25, 2026
56
ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!
Blog

ऊसतोड कामगारांचे जगणे झाले कठीण; एका बाजूला दुष्काळ, तर दुसरीकडे उसाच्या फडात संघर्ष!

October 24, 2026
23
श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन
Blog

श्रीगोंदा बसस्थानकावरील आंदोलनाची दखल; कंडक्टर गिलके यांच्यावर सात दिवसांत कारवाईचे लेखी आश्वासन

October 24, 2026
37
शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!
Blog

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात; गटशिक्षणाधिकारी धुमाळ यांच्या कार्यपद्धतीवर ग्रामस्थांचा संताप!

October 24, 2026
28
Next Post
भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

भीमाशंकर ते कर्जत-सायडोंगर; टोरंट पॉवरच्या प्रकल्पासाठी वृक्षतोडीचा आरोप..!

ताज्या बातम्या

पिराचीवाडी शाळेची माजी विद्यार्थिनी कुस्तीपटू शितल नेव्हारेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड!

पिराचीवाडी शाळेची माजी विद्यार्थिनी कुस्तीपटू शितल नेव्हारेची राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड!

October 25, 2026

वीज कंत्राटी कामगारांच्या बोनसचा प्रश्न ऐरणीवर; राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

October 25, 2026
अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

अकोट येथे ‘भगवान बिरसा कला संगम २०२६’ उत्साहात संपन्न

October 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In