• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

समृद्धी महामार्गावर मोठा अनर्थ टळला! शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणारी सीआरपीएफची मिनी बस ट्रकला धडकली

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
October 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
समृद्धी महामार्गावर मोठा अनर्थ टळला! शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणारी सीआरपीएफची मिनी बस ट्रकला धडकली
0
SHARES
8
VIEWS
Ad 1
Ad 1

पहाटेच्या अपघातात बसचे मोठे नुकसान; सुदैवाने चालकासह सर्व जवान सुखरूप, शहीद जवानाचे पार्थिव सुरक्षित

मालेगाव, जि. वाशिम, दि. २७ ऑक्टोबर : मालेगाव तालुक्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या शासकीय मिनी बसला मंगळवारी, दि. २७ ऑक्टोबर रोजी पहाटे सुमारे ४ वाजताच्या दरम्यान अपघात झाला. सुदैवाने या दुर्घटनेत बसमधील चालकासह सर्व जवान सुखरूप असून, शहीद जवानाचे पार्थिवही सुरक्षित राहिले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

RelatedPosts

रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

पिंवदळ बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ई-कचरा जनजागृती मोहीम

दुष्काळात सार्वजनिक विंधन विहीर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; धारूर नगरपरिषद दखल कधी घेणार?

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील तळोजा येथून सीआरपीएफचे शहीद जवान जय लालसिंग चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी वसंतनगर, ता. दिग्रस येथे नेण्यासाठी दोन वाहनांचा काफिला निघाला होता. हा काफिला मंगळवारी पहाटे सुदी आणि अनसिंग गावांच्या परिसरातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक २३४ जवळ आला असता, एका सिमेंट मिक्सर ट्रकने डाव्या बाजूने ओव्हरटेक करून पुढे जात अचानक ब्रेक लावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. त्यामुळे मागून येणारी सीआरपीएफची मिनी बस ट्रकला धडकली.

या अपघातात मिनी बसच्या पुढील भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बसचे चालक दादहरी कदम (रा. सीआरपीएफ ग्रुप सेंटर, तळेगाव दाभाडे, जि. पुणे) यांनी याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

सिमेंट मिक्सर ट्रकचालकाच्या भरधाव आणि निष्काळजी वाहनचालनाामुळे अपघात झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या दुर्घटनेत मिनी बसचे अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणाऱ्या वाहनाला अपघात झाल्याने काही काळ चिंता निर्माण झाली होती. मात्र, सुदैवाने बसमधील चालक आणि सर्व जवानांना कोणतीही दुखापत झाली नाही. तसेच शहीद जवानाचे पार्थिवही सुरक्षित राहिले.

या घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील वाहनचालकांनी वेगमर्यादा आणि सुरक्षित अंतराचे पालन करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.

Ad 1
Tags: Aalok Bande
Previous Post

पिंवदळ बु. येथील जिल्हा परिषद शाळेत ई-कचरा जनजागृती मोहीम

Next Post

रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

Related Posts

रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ
ताज्या घडामोडी

10
दुष्काळात सार्वजनिक विंधन विहीर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; धारूर नगरपरिषद दखल कधी घेणार?
ताज्या घडामोडी

दुष्काळात सार्वजनिक विंधन विहीर दुरुस्तीच्या प्रतीक्षेत; धारूर नगरपरिषद दखल कधी घेणार?

October 28, 2026
3
ताज्या घडामोडी

पाणी पेटले! रखडलेली कामे पूर्ण न केल्यास १५ नोव्हेंबरला रास्ता रोको – सविता तळेकर

October 28, 2026
4
दुःख बाजूला सारून जनसेवेचा वसा जपणारे लोकनेते डॉ. तानाजीराव सावंत!
ताज्या घडामोडी

दुःख बाजूला सारून जनसेवेचा वसा जपणारे लोकनेते डॉ. तानाजीराव सावंत!

October 28, 2026
7
साईनाथ महाराज वसमतकर यांची कीर्तनसेवा शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार
ताज्या घडामोडी

साईनाथ महाराज वसमतकर यांची कीर्तनसेवा शाळा-महाविद्यालयांपर्यंत पोहोचणार

October 27, 2026
106
Next Post
रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

ताज्या बातम्या

बालकांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी

बालकांची सुरक्षितता ही संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी

October 28, 2026
रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

रामेश्वरवाडीचा अभिमान! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. विष्णू हांगे झाले अस्थिरोगतज्ज्ञ

October 28, 2026
समृद्धी महामार्गावर मोठा अनर्थ टळला! शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणारी सीआरपीएफची मिनी बस ट्रकला धडकली

समृद्धी महामार्गावर मोठा अनर्थ टळला! शहीद जवानाचे पार्थिव घेऊन जाणारी सीआरपीएफची मिनी बस ट्रकला धडकली

October 28, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In