पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण; बाजीराव हजारे यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ
चिचोंडी पाटील | वार्ताहर :
चिचोंडी पाटील येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. मार्केट कमिटीचे माजी संचालक बाजीराव हजारे यांच्या वतीने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लेखक डॉ. संजय कळमकर उपस्थित होते. त्यांनी आपल्या मनोगतात महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले.
यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा चिटणीस अशोक कोकाटे, सेवा सोसायटीचे माजी चेअरमन महादेव खडके, शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य विजय गाडे, प्रवीण कोकाटे, अंबादास कोकाटे, शाम कोकाटे, पांडुरंग वाडेकर, भाऊसाहेब हजारे, बबलू बेल्हेकर, बाबासाहेब बेल्हेकर, आदिनाथ हजारे, शिवाजी ससाने, बाळासाहेब हजारे, पुरुषोत्तम वाडेकर आणि मयूर पवार उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.








