• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात संविधान दिन साजरा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 28, 2026
in ताज्या घडामोडी
0
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

संविधानातील मूलभूत हक्क आणि कर्तव्यांवर अ‍ॅड. डॉ. दिपाली जयवंत यांचे मार्गदर्शन; इच्छापत्र आणि लिव्हिंग विल तयार करण्याचा ज्येष्ठांना सल्ला

नेरूळ | प्रतिनिधी :

नेरूळ येथील ज्येष्ठ नागरिक भवनात गुरुवार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी ज्येष्ठ नागरिक संघ, नेरूळ आणि महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ (फेसकॉम) यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय संविधान दिन साजरा करण्यात आला.

RelatedPosts

आलेगावच्या आनंद बौद्ध विहारात संविधान दिन साजरा

घोसरवाडमध्ये मावा, गुटखा विक्री आणि मटका सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी संकटात; तोडणीसाठी पाच शेतकऱ्यांचा सामूहिक निर्णय

कार्यक्रमात प्रमुख व्याख्यात्या म्हणून अ‍ॅड. डॉ. दिपाली जयदीप जयवंत उपस्थित होत्या. त्यांनी संविधानाने नागरिकांना दिलेले मूलभूत हक्क आणि कर्तव्ये यांची माहिती दिली. तसेच ज्येष्ठ नागरिकांनी आपले इच्छापत्र आणि ‘लिव्हिंग विल’ तयार करून ठेवावे, असा सल्ला दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी फेसकॉमचे अध्यक्ष डॉ. अण्णासाहेब टेकाळे होते. भारतीय संविधान ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेली महत्त्वाची देणगी असल्याचे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विकास साठे यांनी प्रास्ताविकात संविधान लागू होऊन ७६ वर्षे पूर्ण झाल्याचा उल्लेख केला. संविधानातील समता, बंधुता, न्याय आणि सामाजिक न्याय ही तत्त्वे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचली आहेत का आणि त्यांचा लाभ सर्व घटकांना मिळतो आहे का, याचा आत्मपरीक्षणपूर्वक विचार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

या वेळी फेसकॉमचे उपाध्यक्ष अशोक तेरकर, सचिव चंद्रकांत महामुनी आणि मुंबई विभागाचे अध्यक्ष सुरेश पोटे उपस्थित होते. त्यांनी उपस्थितांना संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला फेसकॉमचे पदाधिकारी आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव अजय माढेकर यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यात वाढदिवस असलेल्या संघाच्या सभासदांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Ad 1
Tags: Bhalchandra Mane
Previous Post

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

Related Posts

आलेगावच्या आनंद बौद्ध विहारात संविधान दिन साजरा
ताज्या घडामोडी

आलेगावच्या आनंद बौद्ध विहारात संविधान दिन साजरा

November 28, 2026
16
घोसरवाडमध्ये मावा, गुटखा विक्री आणि मटका सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप
ताज्या घडामोडी

घोसरवाडमध्ये मावा, गुटखा विक्री आणि मटका सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप

November 28, 2026
202
पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी संकटात; तोडणीसाठी पाच शेतकऱ्यांचा सामूहिक निर्णय
ताज्या घडामोडी

पावसाअभावी ऊस उत्पादक शेतकरी संकटात; तोडणीसाठी पाच शेतकऱ्यांचा सामूहिक निर्णय

November 28, 2026
62
एरंडोलमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावरील २६ पुस्तकांचे प्रकाशन
ताज्या घडामोडी

एरंडोलमध्ये महात्मा फुले यांच्या जीवनकार्यावरील २६ पुस्तकांचे प्रकाशन

November 28, 2026
13
निवळी विद्यालयाचे सार्थक पवार विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात प्रथम
ताज्या घडामोडी

निवळी विद्यालयाचे सार्थक पवार विज्ञान प्रदर्शनात माध्यमिक गटात प्रथम

November 28, 2026
64
वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश
ताज्या घडामोडी

वरोरा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात साई विद्यालय वंधलीचे यश

November 28, 2026
9

ताज्या बातम्या

नेरूळमध्ये ज्येष्ठ नागरिक संघात संविधान दिन साजरा

November 28, 2026
Auto Draft

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In