सिद्धार्थ कदम
जिल्हा प्रतिनिधी
महागांव/पुसद दि ४
पुसद काटखेडा कातरवाडी खामलवाडी ब्रह्मी बोरी वागद मार्गे काळी दौ बस सेवा सुरु करण्याची मागणी परिवहन मंत्रालय मुंबई व विभाग नियंत्रक यवतमाळ यांना संध्या रणवीर तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांनी निवेदनातुन केली आहे.
स्वातंत्र्या नंतर अद्याप पर्यंत या रस्त्याने गाडी सुरु झाली नसल्याने या कातरवाडी खामलवाडी ब्रह्मी वडद बोरी वागद या रस्त्यातील गावकऱ्यांना शेतकऱ्यांना,विध्यार्थ्यांना महत्वाच्या कामासाठी बाजारासाठी मुख्य बाजारपेठ असलेल्या काळी दौ. येथे खाजगी वाहणाचा आधार घेऊन प्रवास करावा लागतो प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून हा रस्ता कित्येक वर्षांपूर्वी बनला असताना ह्या मार्गांवर अद्याप राज्य परिवहन महामंडळाची बस सेवा मिळाली नाही ही शोकांतिका आहे. यासाठी या मार्गाने बस सुरु करावी अशी मागणी संध्या रणवीर यांनी अध्यक्ष राज्य परिवहन महामंडळ सेंट्रल मुंबई, व आगार व्यवस्थापक मंगेश पांडे पुसद यांनी या संबंधाने कार्यवाही वरिष्ठ स्तरावर पाठवून मंजुरी मिळताच रस्त्याचा सर्व्हे करून करण्यात येईल असे आश्वासन दिले.
Discussion about this post