वनपरिक्षेत्र कार्यालय मांडवी अंतर्गत सारखणी घाटातील जंगलातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वन तपासणी नाक्याच्या काही अंतरावरच अज्ञात वाहनाच्या धडकेत दिनांक. 27/10/2024. रात्री.8:30 ते 9:00 च्या दरम्यान बिबट्या जातीचा वाघा च्या मृत्यू प्रकरणी संबंधित सहाय्यक वनसंरक्षक किनवट व वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना बडतर्फ करून वरिष्ठ स्तरावरची समिती नेमून दोशींवर फौजदारी गुन्हे दाखल करणे वनाच्या राजाचा अज्ञात वाहन च्या धडकेत दुर्दैवी मृत्यूप्रकरणी संबंधित वन विभागातील अधिकारी च्या हलगर्जीपणामुळे मयत पावलेल्या बिबट्या वाघ नामक जातीच्या प्रणायचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना
घडल्याची वार्ता कळताच परिसरातील शेकडो लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळावरून संबंधित सहाय्यक वनसंरक्षक किनवट व वनपरिक्षेत्र अधिकारी मांडवी यांना फोन द्वारे घटना सांगून सुद्धा घटनास्थळी पोहोचण्यास दीड ते दोन तास उशिर झाल्यामुळे मयत बिबट्या चा शव घटनास्थळावरून गायब झाल्याचे उघडकीस आल्याने वन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून वाघाच्या शव शोध मोहीम राबविण्यात आली तरी देखील आजतागायत पर्यंत वाघाचा शव प्राप्त न झाल्यामुळे परिसरातील वन्यप्रेमी नागरिकांना वाघ दुर्मिळ जातीच्या दुर्घटनेत जीव गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे वाहनाचा तपास व घटनास्थळावरून वाघाचा मृत्यू देह अद्याप पर्यंत प्राप्त न झाल्यामुळे संबंधित कर्मचारी यांना शासनाचे मुख्यालय राहण्याचे सक्तीचे आदेश असून सुद्धा अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याने वनावरील नियंत्रण कसे आहे यातून दिसून येत आहे.
करिता मेहेरबान साहेबांनी संबंधित दोषी कर्मचारी अधिकाऱ्यास बडतर्फ करून वरिष्ठ स्तरावरची चौकशी समिती नेमून दोशींवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी रवि राठोड मनसे जिल्हाध्यक्ष यांनी जिल्हाधिकाऱ्यासह मुख्य वनसंरक्षक व उपसरक्षकाकडे केली आहे..
Discussion about this post