छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान च्या वतीने राजा शिवछत्रपती परिवारास पुरस्कार देण्यात आला. राजा शिवछत्रपती परिवार संस्था… एक गड किल्ल्यांसाठी धडपडणारी संस्था आपलं वेगळेपण टिकवून आहे. तर परिवार या नावाने, सुरवातीस सर्वांना मी जे दादा आणि ताई म्हणाल ती देन ही या परिवाराची… नियम आणि शिस्त या परिवाराचा आत्मा . याचमुळे हजारो मावळे एक दशकापेक्षा जास्त एकमेकांना कुटुंबाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर जपत आहेत..
आता परिवार म्हणाल की एक कुटुंब प्रमुख पाहिजे, ते व्यक्तिमत्व म्हणजे सुनील दादा सुर्यवंशी, परिवाराच रोपट लावणारा शिवकार्याचं व्यसन असणारा माणूस….. २०१४ ला भारतीय सेनेत असताना ह्या परिवाराची सुरवात फेसबुकवर दि. ३१ जुलै २०१४ रोजी ‘राजा शिवछत्रपती’ या नावाने व्हाट्सॲपवर गृप बनवला गेला. व्हाट्सॲप व फेसबुकवर मावळे जोडत गेले. मावळ्यांना एकाच विचारांच्या छत्रछायेखाली ठेवण्यासाठी गृपचे काही ‘नियम’ बनवले. गृप मध्ये कुणालाही समाविष्ठ करताना प्रत्येकाला ते नियम पाठवले जातात आणि मान्य असणार्यांनाच प्रवेश दिला जात होता.
परिवाराची पहिली मोहीम पन्हाळगडावर (कोल्हापुर) दि. ५ एप्रिल २०१५ रोजी राबवली गेली,१४ मावळ्यांचा प्रतिसाद मिळाला. दुसरी मोहीम ३ महिन्यानंतर किल्ले राजगड येथे राबवली गेली. संख्या वाढली गेली. मोहीम संपऊन जाताना मावळे गळ्यात गळा घालुन रडु लागले. तेंव्हा त्यांच्यातला आदर, प्रेम तथा एकजुट एखाद्या कुटुंबासारखी जाणवली. म्हणुन गृपला नाव “राजा शिवछत्रपती परिवार” देण्यात आले. परिवारच्या वाढत्या पसाऱ्यामुळे आणि सर्वांमध्ये एकसंघता दिसावी यामुळे २०१६ ला परिवारचा ड्रेस कोड म्हणुन आणि महाराजांच्या झेंड्याचा रंग भगवा असल्याने कुर्त्याचा रंगही तोच ठेवला. महाराष्ट्रभरातुन मावळे वाढत गेले. व्हाट्सॲप गृप मधिल समाविष्ट संख्याही वाढत गेली. नियोजनाला सोपं व्हावं म्हणुन जिल्ह्यानुसार विभागीय परिवार स्थापन केले गेले. नियोजनाला सोपं जावं म्हणुन ‘अष्टप्रधान’ गृप काढला गेला. परिवार मधिल सर्व निर्णय हे ‘मुख्य अष्टप्रधान’ घेत असते.
सर्व जिल्ह्यातील विभाग प्रमुखांची तथा जबाबदार मावळे/रणरागिणींची निर्णयात मदत घेऊन परिवार आपले कार्य करत आहे. काही महिलाही मोहीमेसाठी स्वेच्छेने येऊ लागल्या. त्यातुनच ‘रणरागिणी परिवार’ अस्तित्वात आला. आज महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लाऊन गडावर काम करत आहेत याचाही सार्थ अभिमान आहे.
आज परिवार महाराष्ट्रभर सांगली, सातारा, कोल्हापुर, सोलापुर, रत्नागिरी, पुणे, अहमदनगर, रायगड, पालघर, मुंबई, ठाणे, नाशिक, जळगाव, छ. संभाजीनगर, अकोला, वाशिम, नागपुर, अमरावती, जालना, लातुर, बुलढाणा, धाराशिव, बीड, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपुर, भंडारा, धुळे, नंदुरबार इ. ३० जिल्ह्यांमध्ये विखुरलेला असुन २० जिल्ह्यांचे विभागीय परिवार आहेत. ज्या जिल्ह्यात गड किल्ले नाहीत ते मावळे/रणरागिणी सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम व पुरग्रस्थ मदत मोहीम राबवतात. अनाथाश्रम/वृद्धाश्रम/गरीब शेतकरी/विशेष मुलांची शाळा वगैरेला परिवार नेहमीच मदत करुन समाजाप्रती असलेले ऋण फेडायचा प्रयत्न करत असतो. प्रत्येक पावसाळ्यात परिवारा तर्फे सर्व जिल्ह्यांमध्ये ‘वृक्षारोपण’ मोहीम राबऊन नैसर्गिक चलचक्रातही सामिल होत आहे. आज समाजाला व देशाला घडवण्यासाठी चांगल्या विचारांच्या पिढिला घडवायचं कामही परिवार अवितरतपणे करत आहे… ज्यांना परिवाराबद्दल अधिक माहिती हवी आहे त्यांनी खालील दिलेल्या नंबर वरती संपर्क साधावा ७७०९१२३३८८
Discussion about this post