उद्घाटन समारंभ..!
सांगली जिल्हा परिषद माजी अध्यक्ष तथा सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मा. संग्राम देशमुख (भाऊ) यांच्या हस्ते पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातील नेवरी येथील आमचे स्नेही व सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक श्री. मोहन सदाशिव महाडिक यांचे चिरंजीव युवा उद्योजक श्री. तेजस मोहन महाडिक यांच्या “अनिता प्लास्टिक इंडस्ट्रीज” या नवीन उद्योगाचा उद्घाटन सोहळा पार पडला. कडेगाव एमआयडीसी येथे सुरू झालेल्या या उद्योगात प्लास्टिकच्या खुर्ची, टेबल आणि टॉप तयार केले जात आहेत.
या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी मा. सिद्धनाथ महाडिक, विकास भोसले, मधुनाना भोसले, विकास माने, संजय पाटील, संतोष करांडे, सचिन महाडिक, मारुती महाडिक, यशवंत महाडिक, संजय महाडिक, विलास महाडिक, जनार्दन महाडिक, नवनाथ महाडिक, संतोष महाडिक, विशाल निकम, विश्वास महाडिक, अभिजित महाडिक आणि पंकज महाडिक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
युवा उद्योजकांच्या या धडपडीने देशाच्या अर्थव्यवस्थेला नेहमीच सकारात्मक दिशा दिली आहे. कडेगाव तालुक्यात श्री.तेजस महाडिक यांच्यासारख्या नव उद्योजकांकडून रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होतील अशी आशा व्यक्त केली.
Discussion about this post