वैजापूर: गोळवाडी येथील ग्रामदैवत गवळीबाबा येथे बैलपोळा साजरा करण्यासाठी आलेल्या पंचक्रोशीतील गावांना मृत्युंजय ग्रुप तर्फे भोजनाची व्यवस्था. वैजापूर तालुक्यातील ग्रामदैवत असलेले गवळीबाबा येथे पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी ग्रामदैवत असलेले गवळीबाबा येथे पंचक्रोशीतील बैल दर्शनासाठी येतात.
पंचक्रोशीतील ग्रामस्थांची असलेली श्रद्धा त्यामुळे तेथे पालखेड, दहेगाव, सागज, जांबरगाव, बेंदवाडी, परसोडा असे अनेक गावातून भाविक गवळीबाबा येथे बैलांना घेऊन दर्शनाला येतात. पंचक्रोशीतील भाविक सकाळी लवकर जनावरांना घेऊन गवळीबाबाच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे गवळीबाबा येथे पंचक्रोशीतील ग्रामस्थांची भोजनाची व्यवस्था मृत्युंजय ग्रुप दरवर्षी करत असतो त्यामुळे पंचक्रोशीतील भाविक मृत्युंजय ग्रुपचे खूप खूप आभार मानतात.
Discussion about this post