
दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी सांगली जिल्हा विटा(खानापूर ) तालुक्यातील पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ७ सप्टेंबर २०२४ ला गणपती बाप्पा यांचे आगमन होत आहे.
तत्पूर्वी पोलीस प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची जोरदार तयारी प्रशासन स्तरावर करण्यात आली आहे. या 11 दिवसाच्या काळामध्ये कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून विटा पोलीस निरीक्षक माननीय श्री धनंजय फडतरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली विटा पोलीस स्टेशन हद्दीतील प्रत्येक गावोगावी जाऊन पोलीस अधिकारी मंडळातील सदस्यांना योग्य त्या सूचना आणि मार्गदर्शन करत आहेत.
आज पंचलिंगनगर (भाळवणी) या गावामध्ये पोलीस अधिकारी यांनी भेट दिली.यावेळी गावचे पोलीस पाटील मा.गिरिदेव पाटील यांनी योग्य प्रकारे या भेटीचे नियोजन केले. ग्रामपंचायत कार्यालय पंचलिंगनगर येथे हा कार्यक्रम पार पडला.यावेळी विटा पोलीस स्टेशन चे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जे.ए.कांबळे मॅडम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक एस.एस.महाडिक साहेब ,पोलिस अंमलदार सुनील पाटील साहेब,पोलिस अंमलदार बाबासाहेब खरमाटे साहेब उपस्थित होते.
पंचलिंगनगर गावचे विद्यमान सरपंच मा.संग्राम नलवडे यांनी अधिकाऱ्यांना गावची ओळख करून दिली.सोबत गणेशोत्सवाच्या काळात गावामध्ये कोणत्याही प्रकारे अनुचित प्रकार घडणार नाही याची हमी दिली.यावेळी गावचे ज्येष्ठ नागरिक माजी सरपंच.मनोहर नलवडे,सदस्य मधुकर नलवडे यांनी मंडळातील सदस्यांना मार्गदर्शन करून गणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहान केले.
उपस्थित मंडळाचे सदस्य आणि ग्रामस्थ यांना कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जे.ए.कांबळे मॅडम यांनी मार्गदर्शन करत असताना काही सूचना दिल्या यामध्ये ,गावातील मंडळांची नोंदणी करणे, पोलीस स्टेशन मधून परवाने घेणे,पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणे,महिला व ज्येष्ठ नागरिक यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या गोष्टींचे नियोजन करणे, डॉल्बी मुक्त गणेशोत्सव साजरा करणे,वेळोवेळी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करणे,कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडणाऱ्या प्रत्येक घटनेवर २४ तास पोलीस पथकाचे सुक्ष्म लक्ष राहणार आहे. तालुक्यात गणेशोत्सव काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांची विशेष टीम तैनात ठेवली जाणार आहे. ज्यामुळे पोलिसांना सुव्यवस्था राखण्यास मदत होईल, रस्त्यावर, मंडपाजवळ गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा येणार नाही, याची खबरदारी मंडळांनी घ्यावी. सोशल मीडियावरील अफवांवर विश्वास ठेवू नये. उत्सव काळात नागरिकांना अनुचित प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा,असे आवाहन करण्यात आले. तसेच या गणेशोत्सवाच्या काळात जर कोणी अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला.
यानंतर मंडळ सदस्यांच्या हस्ते अधिकाऱ्यांचे शाल-श्रीफळ देवून सत्कार करण्यात आले. नंतर मंडळ सदस्य अभिषेक नलवडे यांनी उपस्थित अधिकारी व मंडळ पदाधिकारी,ग्रामस्थ यांचे आभार व्यक्त करुन कार्यक्रम संपला असे जाहीर केले.
यावेळी गावचे सरपंच.संग्राम नलवडे,सदस्य.मधुकर नलवडे,पोलीस पाटील.गिरिदेव पाटील, माजी सरपंच.मनोहर नलवडे, दत्तात्रय नलवडे,फौजी प्रकाश शेळके,सदाशिव नलवडे,जयसिंग नलवडे,मंडळ अध्यक्ष वैभव नलवडे,प्रशिल चव्हाण,महेश नलवडे,मंडळ सदस्य धनाजी नलवडे,निलेश शिंदे, रविंद्र नलवडे,प्रशांत मोहिते,रोहित नलवडे,अमित नलवडे, चैतन्य नलवडे इतर मंडळ पदाधिकारी व गावचे जागरूक ग्रामस्थ उपस्थित होते.
Discussion about this post