नांदेड जिल्हा प्रतिनिधी संदिप पानपते :-किनवट
शहरासह सर्व तालुक्यात आज दुसऱ्या दिवसी ही अतिवृष्टी होवून शेतातील कापूस, सोयाबिन, ज्वारी व मक्काची पिके आडवी पडून मोठे नुकसान झाले कच्चा घरांची पडझड झाली. जनावरे दगावली ग्रामिण भागातील काही कच्या रस्त्यावरू पाणी वाहून गेल्याने मोठ मोठे खडे पडून रस्त्यांचे मोठे नुकसान झाले. शहरापासून जवळच असलेल्या पैनगंगा नदीने धोक्याची पातळी आलांडली आहे. रात्री पाऊस सुरू राहील्यास पुलावरून पाणी
जाऊन विदभार्चा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. सर्व नुकसान ग्रस्तांच्या नुकसानीचे प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून तात्काळ शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकरी व इतर नागरिक करत आहेत.
तालुक्यात दि. ३१ ऑगष्ट रोजी रात्री पासून आज दिनांक 3 सप्टेंबर रोजी ही दिवसभर ढग फुटी सदृष्य पाऊस सुरु असून नदी, नाले तुडूंब भरुण वाहत आहेत. तालुक्यातील ९ मंडळात अतिवृष्टी
झाल्याने शेतीतील कापूस, सोयाबिन
मक्का व इतर पिंकाचे मोठे नुकसान झाले तालुक्यातील घरांची पडझड झाली. जनावरांचा मृत्यू झाला नदी, नाल्याना पूर आल्याने काठावरील शेतीत पाणी शिरल्याने जमिनी खरडून जाऊन जमिनीचे मोठे नुकसान झाले. किनवट तालुक्यातील जनतेला अतिदृष्टी चा मोठा फटका बसला आहे. तालुक्यातील नुकसानीने हवालदिल झालेले शेतकरी व इतर नुकसान ग्रस्त नागरीक त्वरीत नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करीत
आहेत.


Discussion about this post