नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यानी विधानसभा निवडणुकीची ट्रेनिंग रद्द करून शेतकऱ्यांच्या थेट बांधावर तहसीलदारासह मंडळ अधिकारी व तलाठ्यांना आदेशित देत पंचनामा करून सरसकट शेतकऱ्यांना अनुदान व विमा घ्यावेत…..
गजनन पा चव्हाण….
नायगांव तालुका प्रतिनिधी…
दिपक गजभारे घुंगराळेकर…
नायगांव:- नायगांव येथील शेतकरी भूमिपुत्र गजानन पाटील चव्हाण यांनी नायागांव मतदार संघातील सर्वच तहसीलदार यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी निवडणुकीच्या ट्रँडिंगसाठी संभाजीनगर या ठिकाणी गेलो असल्याचे सांगितले असल्याचे व गजानन चव्हाण यांनी केलेल्या व्हिडीओ मध्ये म्हटले आहे….
नायगाव उमरी धर्माबाद मतदारसंघासह,
नांदेड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवाचें अतिवृष्टी मुसळधार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे सोयाबीन कापूस उडीद मूग तूर व खरीब सर्व पिके पिवळे पडून सडले गेले आहेत काही पीक मुळासकट वाहून गेले जनावरे वाहून गेले शेतकऱ्यांचा गोठा मुळासकट वाहून गेला तसेच घरपडी असे अनेक प्रकारे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे,
जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे नांदेड जिल्ह्यासाठी आदर्श जिल्हाधिकारी आहेत जन सामान्य शेतकऱ्याचे कर्तबगार अधिकारी म्हणून आहेत….
शेतकऱ्यासाठी मोठे प्रयत्न करीत आहेत तरी जिल्हाधिकारी साहेब साऱ्या बाजूचा विचार करून जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या ट्रेनिंग साठी संभाजीनगर या ठिकाणी गेलेले जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांना तात्काळ बोलून घेऊन व मंडळ अधिकारी व तलाठी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पाहणी पंचनामा करण्यासाठी तात्काळ आदेश करावे अशी मागणी गजानन पाटील चव्हाण यांनी केली आहे
जिल्हा अधिकारी यांना फोन करून व व्हिडिओ पाठवून मागणी केली आहे……
Discussion about this post