कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75000 अनुदान द्यावे.
कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने मा. तहसीलदार यांना निवेदन
कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75000 अनुदान द्यावे कंधार तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करून बाधित शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी 75000 रू व सन 2022-23 मधील पिक विमा मिळून द्यावा अशी आर्थिक मदत देण्यासंदर्भात मा तहसीलदार साहेब यांना कंधार तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन देण्यात आले….!!
यावेळी कंधार काँग्रेस तालुकाध्यक्ष बालाजी पांडागळे, शहराध्यक्ष म. हम्मीद म सुलेमान, मा नगरसेवक शहाजी राजे नळगे, काँग्रेस तालुका उपाध्यक्ष स्वप्नील पाटील लुंगारे, मागासवर्गीय जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पवार, तालुकाध्यक्ष काँग्रेस सो मि कंधार सतीश देवकत्ते, तालुका सचिव सुरेश कल्हाळीकर, सभापती प्रतिनिधी दत्तात्रय पाटील घोरबांड, मा युवक अध्यक्ष कमलाकर पा शिंदे, सरपंच अवधूत पा शिंदे, माधव पा भुते, प्रा विजय भिसे, नितीन राजुरकर सर, शिवा पाटील, गोंविद मामा राठोड, विश्वनाथ पवार, गौतम वडजे आदी उपस्थित होते….!!
यावेळी मा. तहसीलदार साहेब यांना
1) ओला दुष्काळ,
2) तात्काळ आर्थिक मदत,
3) सन 2022-23 मधील पिक विमा,
4) सन 2023-24 खरीप पिक विमा ऑनलाइन तक्रार दाखल केल्यामुळे मंजूर रक्कम तात्काळ वाटप करणे…यावर सविस्तर चर्चा करण्यात आली…!!
Discussion about this post