***स्तुत्य उपक्रम ***
नेतंसा–
नेतंसा येथील श्री गजानन महाराज मंदिर समितीने गणेश चतुर्थी निमित्त श्री गणेशा ची विधीवत स्थापना करून एक आगळा वेगळा आदर्श उपक्रम सुरु केला आहे. दररोज पुजेला येणाऱ्या जोडप्याला एक वृक्ष भेट दिली जाणार आहे.
पर्यावरणाची होत चाललेली अपरीमीत हानी आणि त्यामुळेच निसर्गाचा असमतोल निर्माण होत आहे. त्याचाच फटका बळीराजाला बसत आहे. एका मुंगीच्या पाया एवढा का होइना पण पर्यावरण संवर्धना मधे या उपक्रमाचा नक्कीच वाटा असणार आहे. कारण वृक्ष संवर्धन ही काळाची गरज निर्माण झाली आहे. आणि गरज ओळखून च श्री गजानन महाराज मंदिर समीतीने अतिशय सुंदर निर्णय घेतला आहे
या उपक्रमाचे सर्व च स्तरातून कौतुक होत आहे. मंदिर समीतीने असेच पर्यावरण पुरक इतरही उपक्रम राबवून एक आदर्श निर्माण करावा. किमान येणाऱ्या पिढीसाठी नक्कीच फलदायी ठरेल यात शंका नाही.
एक अफलातून उपक्रम, स्तुत्य उपक्रम आयोजित करून पर्यावरण स्नेही जीवनशैलीबाबत संदेश दिला. मंदिर समितीचे खूप खूप अभिनंदन आणि अशाच उपक्रमा साठी भरभरून शुभेच्छा





Discussion about this post