सोयगाव तालुका प्रतिनिधी:- सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव हे महावितरण विज बिल वसूल थकीत नसुन सुद्धा गोंदेगाव येथील विज ग्राहक महावितरन कंपनीच्या जाचाला कंटाळे गोंदेगावात दर पाच मिनिटांत लाईट लपंडाव खेळत असते त्यामुळे लहान मुले,अभ्यास,बुडतो,मोलमजुरी करून घेतलेल्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूचे,मुलांच्या शिक्षणासाठी माताबगीनी यांनी गळ्यातील मनी मंगळसूत्र विकुन घेतलेले संगणक व इतर वस्तू चे नुकसान होते,त्यामुळे महिला,शाळेचे विद्यार्थी,व्यापारी,घरातील आजारी व्यक्ती,गावात पाच मिनिटांत लाईन सूध्दा टिकत नसल्याने,आजारांचे सुद्धा प्रमान वाढले आहे,ग्रामीण भाग असल्याने डास मछर,इतर रोग राई पसरल्याची भिती गोंदेगावकरांच्या मनात आहे
तरी अक्षराक्षा गोंदेगाव येथील विज ग्राहकयांनी व ग्रामपंचायत मार्फत बनोटी येथील इंजिनिअर व विज कर्मचारी यांना वेळोवेळी निवेदन देऊन सुद्धा विजकंपनी तर्फे गोंदेगावकरांच्या तोंडाला पाने पुसली त्या मुळे गोंदेगाव विज ग्राहकांमध्ये प्रचंड संतापची लाट आहे त्यामुळे गोंदेगावकरांनी महावितरण कंपनीच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम सुरू केली आहे निवेदनावर जवळजवळ गोंदेगाव करांनी 450 विजग्राहक यांच्या सह्या केल्या आहेत
गावात 930 विज ग्राहक जवळपास आहेत तरी हे निवेदन कनिष्ठ अभियंता सोयगाव,उप कार्यकारी अभियंता सोयगाव,कार्यकारिणी अभियंता सिल्लोड जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांना देण्यात येणार आहेत तरी गोंदेगावकरांनची विजकंपनी मार्फत अर्जाची पंधरा दिवसांच्या आत दखल न घेतल्यास गोंदेगाव वासिय उपोषणाला बसतील व याची सर्व जबाबदारी महावितरण कंपनीची राहील असे निवेदनितुन इशारा देण्यात आला आहे.
Discussion about this post