दौंड तालुका प्रतिनिधी-ता.११ गौरी गणपती सण मोठा नाही आनंदाला तोटा हे म्हणतात ना ते अगदी खरे आहे.
दौंड तालुक्यात गौरी-गणपती सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला घरगुती गौरी -गणपती सजावट खूप छान व सुंदर अशी केलेली पाहावयास मिळाली आसपासच्या महिला वर्गानी हळदी कुंकू-कुंकाच्या कार्यक्रमास गर्दी केलेली पाहावयास मिळाली
३०वर्षाची परंपरा
बोरीपार्धी येथील मांडगे परिवाराने या वर्षी पोस्टर च्या माध्यमातून एक चांगला संदेश देण्याचा प्रयत्न केला त्यांच्याकडे गेली३०वर्षापासून गौरी पूजनाचा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो.
पोस्टरच्या माध्यमातून जनजागृती
झाडे लावा झाडे जगवा, वीज वाचवा देश, स्वच्छ भारत अभियान, स्वच्छ भारत सुंदर भारत, नेत्रदान श्रेष्ठ दान, सरकार पैसे देऊ शकते पण पाणी नाही तेव्हा पाणी आडवा पाणी जिरवा,रेन वॉटर हार्वेस्टिंग -पाण्याची बचत आमची जरुरत, कुटुंब नियोजन.इत्यादी पोस्टर च्या माध्यमातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आहे.
Discussion about this post