प्रतिनिधी
कैलासराजे घरत
सामाजिक कार्यकर्ते महाराष्ट्र भूषण पत्रकार कैलासराजे निर्मला कमलाकर घरत यांच्या घरच्या 5 दिवसाच्या गणपती बाप्पाला मोठ्या भक्तिमय वातावरणात भावपूर्ण निरोप देण्यात आला…
बुद्धीची देवता, देवाधिदेव चौदा विद्या चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची भाद्रपद चतुर्थीला आण्णासाहेब कमलाकर बाबू घरत प्रतिष्ठापना करण्यात आली. बाप्पाच्या प्रसादासाठी आईसाहेब निर्मला कमलाकर घरत यांनी खास उकडीचे एकवीस मोदक, खीर, घावन नैवद्य अर्पण करण्यात आला. बाप्पासाठी सुंदर मखरांची आरास सौ.मयुरी कैलास घरत आणि स्वतः श्री कैलासराजे घरत यांनी केली, नैसर्गिक फुले आणि पर्यावरण पूरक अशा विविध फुलांची सजावट केली होती. विधिवत पूजा अर्चा करण्यात आली.
यावेळी ओवी कैलास घरत, बहिणी ताई कविता गावंड, माई कुणाली पाटील गणपती बाप्पाची मूर्तीचे फेटा, मोरपीस, धोतर, शाल आणि संपूर्ण डायमंड सजावट केल्यामुळेच बापाचे हे सुबक मनमोहक रूप आपणास पाहायला मिळाले, दीदी कीर्ती देसले, भाचा ओम गावंड, सारांश पाटील, भाच्या श्रुती पाटील, वैष्णवी गावंड, रुही देसले, दिया देसले, भावजी सचिन गावंड, रवींद्र पाटील, रुपेश देसले यांनी सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सर्व मित्र परिवार नातेवाईक, घरत कुटुंबीयांनी बाप्पाचे दर्शन घेतले.
घरात भक्तिमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
गणरायाला साकडे घालत 5 दीवस मनोभावे सेवा करण्यात.. बाप्पा
सर्वांना सुखी ठेव..गणपती बाप्पावर कैलासराजे घरत कुटुंबीयांची श्रद्धा आहे आणि आपल्याकडे जे आहे ते सर्व बाप्पाच्या कृपा आशीर्वादानेच, तोच सुख देणारा आणि दुखांचे हरण करणारा सुखकर्ता दुःखहर्ता आहे. आणि वेलोवेळी याची प्रचिती आहे.
बाप्पा घरातून निघून गेल्यावर घर खाली झाले असे वाटते.. मन भावूक होवून जाते. असे वाटते बाप्पा कायम तुझे वास्तव्य आमच्या हृदयातच आहे. तूच या चराचर सृष्टीचा चालक आहे, तुझ्याशिवाय झाडाचे पान देखील हलत नाही अशा गणराया चरणी नतमस्तक होऊन सदैव तुझी कृपा भक्तांवर ठेव हेच मागणे.
वक्रतुंड महाकाय ! सूर्य कोटी समप्रभ!! निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा!! जन्मोजन्मी हेच मागणे, घडो तुझी सेवा, आले विघ्न दूर करावे गजानन देवा.. हिरवा चाफा, पिवळी फुले त्यात गुंतला तुरा, पार्वतीचा पुत्र गजानन, त्याची सेवा करा…पाई हळू हळू चाला मुखाने गजानन बोला…
मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया…मोरया मोरया अष्टविनायक मोरया.. गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या! अशा घोषणा देत भावपूर्ण अंतकरणाने भाविक भक्तांनी टाळ मृदुंगाच्या गजरात 5 दिवस मुक्कामी असलेल्या गणरायाला गुरुवारी खारपाडा ठाकूरपाडा पंचक्रोशीतील बच्चे कंपनी आबाल वृद्घानी जयजयकाराच्या घोषात भावपूर्ण निरोप दिला.
पाताळगंगा नदी तीरावरील विसर्जन घाटावर सर्व गणपती एकत्र आल्यावर आरती होऊन नंतर अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि शांततापूर्ण भक्तिमय वातावरणात सूर्य अस्ताला जाताना बाप्पा त्याच्या घरी जायला निघाला. अनेक घरगुती बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. बाप्पाला निरोप देताना सर्वजण भावूक झाले होते. गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला! अशा भावूक मुद्रेत भाविक घराकडे माघारी परतत होते.





Discussion about this post