· सारथी महाराष्ट्राचा (१३/०९/२०२४)
भुसावळ (जळगांव) : सातपुडा शिक्षण संस्था संचालित तथा डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्नित स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे कृषी महाविद्यालय, स्वातंत्र्यवीर गणपतराव इंगळे उद्यानविद्या महाविद्यालय तसेच कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये प्रथम वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व पालक मिळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
विद्यार्थी व पालक मेळाव्याच्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी मा.कृष्णराव इंगळे (संस्थापक अध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा.हरिभाऊ इंगळे (उपाध्यक्ष, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), डॉ.शेषराव भोपळे (सचिव, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), डॉ.स्वातीताई वाकेकर (कोषाध्यक्षा, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद), मा.श्री.नितीन सातव (मुख्य कार्यकारी अधिकारी, सातपुडा शिक्षण संस्था, जळगाव जामोद) डॉ.संदीप वाकेकर (कार्याध्यक्ष, सातपुडा कॉन्व्हेंट, जळगाव जामोद) व पालक प्रतिनिधी म्हणून लाभलेले राजू पटेल, प्रा.योगेश गवई (प्राचार्य, कृषी महाविद्यालय, जळगाव जामोद), प्रा.राहुल तायडे (प्राचार्य, कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, जळगाव जामोद), डॉ. विशाल तायडे (प्राचार्य, उद्यानविद्या महाविद्यालय, जळगाव जामोद) उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.योगेश गवई यांनी आपल्या प्रास्ताविकेतून कृषी अभ्यासक्रमाची माहिती तसेच तीनही महाविद्यालयांची उपलब्धी यावर संबोधन केले. डॉ.स्वातीताई वाकेकर व डॉ.शेषराव भोपळे यांनी कृषी शिक्षणाचा सार मांडला. तसेच सातपुडा शिक्षण संस्थेचे अस्तित्वात असलेले विविध शिक्षणक्रम उपयुक्त आहेत याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. सामाजिक जीवनात वावरत असताना शिक्षण महत्त्वपूर्ण ठरते आणि त्यातूनच स्वतःचा कुटुंबाचा आणि आपल्या समाजाचा विकास साधता येतो हा कानमंत्र डॉ.स्वातीताई वाकेकर यांनी सर्व प्रवेशित विद्यार्थ्यांना दिला.
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना सातपुडा शिक्षण संस्थेचे विद्यमान अध्यक्ष मा.कृष्णराव इंगळे यांनी संबोधित करताना विद्यार्थ्यांच्या जीवनात पालकांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. पालकांनी विद्यार्थ्यांवर कोणताही दबाव न टाकता त्यांना पुढे जाण्यास प्रवृत्त करावे. पालक व मुलांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे ही काळाची गरज आहे. पाल्यांमधील न्यूनगंड बाजूला ठेवून त्यांच्याशी सुसंवाद ठेवावा. त्यामुळे पाल्य सुदृढ, निरोगी व तणावमुक्त बनून चांगला नागरिक होईल. तसेच विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास हा सोबतच शारीरिक विकास सुद्धा होणे अत्यंत आवश्यक आहे आणि यासाठी आपण सर्वांनी मिळून सहकार्य करावे. सोबतच स्पर्धा परीक्षा, सरकारी व खाजगी नोक- या , कृषी पूरक उद्योग यावरही प्रकाश टाकला.
विद्यार्थी पालक मेळाव्याच्या कार्यक्रमास अंदाजे ४०० विद्यार्थी – पालक, तीनही महाविद्यालयातील प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन डॉ.विशाल तायडे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा.जिव्हेश साळी यांनी केले.
Discussion about this post