गणेश विसर्जन; बंधाऱ्यात पडून १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू..!!!!
शंकरराव ढगे 9890964982
अर्धापूर,प्रतिनिधी
गणेश विसर्जन मिरवणूकीच्या दिवशी मंगळवारी दि.१७ रोजी गावालगत असलेल्या बंधाऱ्यात पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणूकीवर शोककळा पसरली असून या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदर प्रकरणी पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देळुब बु. येथील विद्यार्थी बालाजी गंगाधर सुर्यवंशी वय १४ हा विद्यार्थी गणेश विसर्जनासाठी गावालगत असलेल्या बंधाऱ्याजवळ गेला असता त्याचा तोल गेल्याने पाण्यात पडला.
त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गणेश विसर्जन मिरवणुकीवर शोककळा पसरली असून गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. यावेळी घटनेची माहिती मिळताच अर्धापूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. या प्रकरणी अर्धापूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
देळुब बुद्रुक येथील सुर्यवंशी कुटुंब रोज मजुरी करून उदरनिर्वाह करणारे आहे. मयत विद्यार्थी हा गावातील जिल्हा परिषद शाळेत वर्ग आठवीत शिक्षण घेत होता. तसेच तो एकुलता एक मुलगा असल्याने सुर्यवंशी कुटुंबावर खूप मोठा आघात झाला असून दुःखाचा डोंगर कोसळा आहे.
Discussion about this post