सांगली येथील, पंचशील नगर, शिंदे मळा, आंबामामा कॉलनी येथे शिवसेना शाखेचे उद्घाटन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, संवेदनशील, लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या आदेशाने शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबवल्या जाणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियाना अंतर्गत या परिसरातील माता-भगिनींची विचारपूस करुन संवाद साधला व त्यांना इतर योजनांची माहितीही दिली.
यावेळी माता-भगिनींचा उस्पुर्त प्रतिसाद मिळाला. तसेच मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहीणींनी मुख्यमंत्री महोदयांचे तोंड भरुन कौतुक करुन आशीर्वाद ही दिले. यावेळी, शिवसेना सांगली जिल्हाप्रमुख महेंद्रभाऊ चंडाळे, उप-जिल्हाप्रमुख आकाश माने, शहरप्रमुख संदीप ताटे, विधानसभा क्षेत्रप्रमुख समिर लालबेग, सारंग पवार, स्वप्निल मस्कर, शाखाप्रमुख, उप-शाखाप्रमुख तसेच शिवसैनिक, पदाधिकारी उपस्थित होते..




Discussion about this post