अंबाजोगाई -(तालुका प्रतिनिधी) कल्याण सोन्नर:-
रविवारी पहाटे अंबाजोगाई लातूर बर्दापूर पाटी जवळ स्विफ्ट कार आणि कंटेनरच्या भीषण अपघातात कारमधील चार प्रवाशांचा बळी गेला. या चारही मृतांची ओळख पटली असून ते सर्व लातूर जिल्ह्यातील रहिवासी आहेत.
लातूर जिल्ह्यातील जगळपूर येथील माधव व्यंकटराव खलंग्रे (वय ५८), आत्माराम माधवराव बाणापुरे (वय ५४), सौदागर केशव कांबळे (वय ५०) हे सोसायटीच्या कामानिमित्त सचिव शिवराज शंकरराव डोम (वय ५, रा. व्यंकटेश नगर, लातूर) यांना सोबत घेऊन शनिवारी रात्री उशिरा छत्रपती संभाजीनगरला जाण्यासाठी स्विफ्ट कार मधून (एमएच 24 एएस 6334) निघाले होते.
रात्री सुरु असलेल्या मुसळधार पावसात अंबाजोगाई लातूर रोडवरील बर्दापूर पाटी जवळ रविवारी पहाटे एक वाजताच्या सुमारास त्यांच्या कारची आणि समोरून येणाऱ्या कंटेनरची (एमएच 12 एमव्ही 7188) जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील चौघांचाही जागीच मृत्यू झाला. बर्दापूर पोलिसांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन सर्व मृतदेह अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात हलविले.
Discussion about this post