शेकडो युवकांचा पक्षात प्रवेश वणी–येथे नुकतेच आयटकचे कामगार,कर्मचारी व भाकपच्या कार्यकर्त्यांच्या प्रचंड असा संयुक्त मेळावा संपन्न झाला.
मेळाव्याचे उद्घाटन राज्य सचिवमंडळ सदस्य काॅ.शाम काळे यांनी केले,अध्यक्षस्थानी आयटकचे जिल्हाध्यक्ष कॉ.विजय ठाकरे होते,प्रमुख मार्गदर्शक राष्ट्रीय कौंसिलर कॉ.तुकाराम भस्मे,आयटक जिल्हा कार्याध्यक्ष कॉ.दिवाकर नागपुरे,वेकोली वणी क्षेत्रचे अध्यक्ष कॉ.जियाउल्लाह खान,उमेदवार कॉ.अनिल हेपट,जिल्हासचिव कॉ.अनिल घाटे उपस्थित होते.याप्रसंगी येणारया विधानसभा निवडणुकीत भाकपचे उमेदवार कॉ.अनिल हेपट यांना प्रचंड मताधिक्याने निवडुन देण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
मतदारसंघातील 300 हि बुथवर लवकरच बुथप्रमुख नेमण्यात येऊन कामाला सुरूवात करण्याचे ठरले.याप्रसंगी विवीध गावातील शेकडो युवकांनी पक्षात प्रवेश घेतला.मेळाव्यातुन प्रचार कार्याची सुरूवात करण्यात आली.मेळाव्याची प्रस्तावना कॉ.अनिल घाटे,संचालन कॉ.संजय भालेराव यांनी तर आभार प्रदर्शन कॉ.बंडु गोलर यांनी केले.मेळाव्याला वणी विधानसभा मतदारसंघातील हजारो कामगार,कर्मचारी,कार्यकर्ते उपस्थित होते.
Discussion about this post