
प्रतिनिधी: भरत पुंजारा
पालघर,मासवन- दि.२५ सप्टेंबर रोजी पालघर तालुक्यातील मासवन गावातील वनिता विलास जाधव हि महिला डहाणू तालुक्यातील वेदांत रुग्णालय धुंधलवाडी येथे उपचार घेत होती. तिची प्रकृती नाजूक असल्यामुळे तिला अचानक O पाॅझिटीव रक्ताची नितांत गरज भासली होती.त्यावेळी रुग्णांच्या नातेवाईकांनी काही रक्त पेढी शी चौकशी केली असता त्यांना रक्त भेटत नव्हते.
अशा वेळी त्यांनी पालघरमधील एका यारी दोस्ती फाउंडेशन शी संपर्क साधला व सर्व हकीकत सांगितली, यारी दोस्ती फांउडेशन ने कुठेही विलंब न लावता लगेच ग्रुपवर रक्तदानाचा मेसेज टाकला असता फाउंडेशन मधील सदस्य अविनाश कामडी जव्हार हुन येऊन वेदांत रुग्णालय धुंदलवाडी येथे जाऊन रक्तदान केले व त्या महिलेला जिवदान दिले. रूग्णाशी कोणतेही नाते नसताना अविनाश कामडी यांनी वेळेवर येऊन माणुसकीचं नातं जपलं त्याबद्दल रक्तदात्याचं व यारी दोस्ती फांउडेशनचे नातेवाईकांनी आभार मानले.
यारी दोस्ती फांउडेशन पालघर हे सामाजिक, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरण अशा विषयांवर लहानमोठे उपक्रम राबवत असते. आतापर्यंत अनेक सदस्यांनी वलसाड,वापी, तलासरी, डहाणू, पालघर, नाशिक, जव्हार अशा अनेक ठिकाणी रुग्णालयात स्वखर्चाने जाऊन नि: स्वार्थ भावनेने रक्तदान करून अनेक रुग्णांचे प्राण वाचवले आहेत. यारी दोस्ती फांउडेशन मध्ये दोन हजारांहून जास्त सदस्य जोडले गेले आहेत.
सर्व सदस्य ज्यांना शक्य असेल तसे वर्गणी गोळा करून जात-पात न मानता समाजकार्य करतात.पावसाळ्यात छत्री वाटप,चादर वाटप, गरजूंना किराणा वाटप, वह्या वाटप असे अनेक लहानमोठे उपक्रम राबवत असतात.
Discussion about this post