• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पालघरच्या सेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशन कॅम्पसमध्ये इस्रोचे अंतराळ प्रदर्शन

पालघरच्या सेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशन कॅम्पसमध्ये इस्रोचे अंतराळ प्रदर्शन

by
February 18, 2026
in Blog
0
230
SHARES
385
VIEWS
Ad 1

पालघर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) यांच्या प्रतिष्ठित ‘विक्रम साराभाई अंतराळ प्रदर्शन’चे आयोजन सेंट जॉन टेक्निकल अँड एज्युकेशनल कॅम्पस वेवूर, मनोर रोड, पालघर (पूर्व) येथे १७ ते १९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत करण्यात आले आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न व अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद मान्यताप्राप्त स्वायत्त संस्था असलेल्या सेंट जॉन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटच्या कॅम्पसमध्ये दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे. मुंबई महानगर विकास प्राधिकरण क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावरील हा मानाचा कार्यक्रम आयोजित करण्याची संधी मिळालेली ही एकमेव संस्था असल्याचा अभिमान व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे. विद्यार्थ्यांमध्ये तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञानाबाबत जागरूकता निर्माण करणे, वैज्ञानिक दृष्टिकोन बळकट करणे आणि तरुणांना विज्ञान, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरसाठी प्रेरित करणे हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश आहे. अंतराळ संशोधन क्षेत्रातील प्रगती, उपग्रह तंत्रज्ञान आणि प्रक्षेपण प्रणाली यांची सखोल व सोपी ओळख करून देत वैज्ञानिक ज्ञान समाजाच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न या प्रदर्शनातून करण्यात येणार आहे.

या प्रदर्शनात उपग्रह तंत्रज्ञान, अंतराळ मोहिमा आणि प्रक्षेपण वाहनांशी संबंधित विविध संवादात्मक प्रदर्शने, दृश्य मॉडेल्स, चाट्‌र्स आणि शैक्षणिक नमुने सादर करण्यात येणार आहेत. उपग्रहांचे कार्यतत्त्व, रॉकेट प्रक्षेपणाची प्रक्रिया आणि अंतराळ मोहिमांमधील तांत्रिक बाबी यांचे सुलभ स्पष्टीकरण देण्यात येईल. भारताच्या अंतराळ संशोधन क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी आकर्षक आणि समजण्यास सोप्या पद्धतीने मांडण्यात येणार आहे. प्रदर्शनातील प्रमुख आकर्षणांमध्ये इस्रोच्या वरिष्ठ शास्रज्ञांसोबत संवाद सत्र, “स्पेस ऑन व्हील्स” हे मोबाईल प्रदर्शन, थेट रॉकेट प्रक्षेपणाची प्रात्यक्षिके, तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा आणि शैक्षणिक प्रदर्शने यांचा समावेश आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागातून शिकण्याची संधी मिळणार असून सैद्धांतिक आणि प्रायोगिक ज्ञानातील दरी कमी करण्याचा प्रयत्न होणार आहे. अंतराळ तंत्रज्ञानाचा संप्रेषण, हवामान अंदाज, नेव्हिगेशन, आपत्ती व्यवस्थापन आणि वैज्ञानिक संशोधन यांसारख्या क्षेत्रांतील उपयोगही या प्रदर्शनात स्पष्ट करण्यात येणार आहेत. तसेच अंतराळ विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील शैक्षणिक अभ्यासक्रम, संशोधनाच्या संधी आणि करिअर मार्गदर्शनाबाबत माहिती देण्यात येईल. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून प्रवेश विनामूल्य आहे. पालघर जिल्हा व परिसरातील शाळा-महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना गटाने या प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

अंतराळ प्रदर्शनासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ उपस्थित आहेत. यामध्ये डॉ. धनी राम राजक (गट संचालक, रअउ-करफड) आणि डॉ. एस. पी. व्यास (निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ) हे मार्गदर्शन करत आहेत अशा प्रकारचे राष्ट्रीय स्तरावरील प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कुतूहलाला चालना देणारे आणि भविष्यातील करिअर निवडीसाठी दिशादर्शक ठरणारे असल्याने या उपक्रमाला मोठ्या प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. सेंट जॉन संस्था अनुभवाधारित शिक्षण व समाजाभिमुख उपक्रमांद्वारे शिक्षण क्षेत्रात नवे आदर्श निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही व्यवस्थापनाने नमूद केले.

Source: जिल्हा प्रतिनिधी श्री केविल पाटील
Via: Kevil
Tags: Milind ChuriRahul thakur
Previous Post

अतिक्रमणाच्या नावाखाली इतिहासावरच घाला; सांगली-मिरज रेल्वेचा अखेरचा साक्षीदार जमीनदोस्त

Next Post

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
17
Next Post
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In