• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पावसाच्या हजेरीनंतरही माहूरमध्ये ‘भिम महोत्सव’ उत्साहात संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
February 24, 2026
in Blog
0
पावसाच्या हजेरीनंतरही माहूरमध्ये ‘भिम महोत्सव’ उत्साहात संपन्न
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

हजारो भीम सैनिकांच्या उपस्थितीत रात्रभर रंगली प्रबोधनाची मैफल

प्रतिनिधी :

त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त माहूर येथे आयोजित करण्यात आलेला ‘भिम महोत्सव’ रविवार (२२ फेब्रुवारी) रोजी उत्साहात आणि अविस्मरणीय वातावरणात पार पडला. सायंकाळी पावसाने हजेरी लावूनही हजारो भीम सैनिक आणि रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला.

RelatedPosts

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच पावसाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र उपस्थितांचा उत्साह कमी झाला नाही. पावसाची पर्वा न करता बुद्धभूमी परिसरात मोठी गर्दी झाली होती. माता रमाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर भिक्खुणी आर्या खेमा यांनी ‘धम्म वंदना’ घेऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.

या महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले सुप्रसिद्ध गायक फैजान ताज (नागपूर) आणि गायिका मंजुषा शिंदे (पुणे) यांनी आपल्या दमदार आवाजात भीमगीते व प्रबोधनात्मक गीते सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. रात्री सुरू झालेला हा सांस्कृतिक कार्यक्रम पहाटे ८ वाजेपर्यंत अखंड सुरू होता. मोठ्या एलईडी स्क्रीनमुळे दूरवर बसलेल्या प्रेक्षकांनाही कार्यक्रमाचा आनंद घेता आला.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माता रमाई यांच्या भाची शुभांगीताई शंकरराव धोत्रे यांची उपस्थिती लाभली. तसेच नगराध्यक्ष फिरोज दोसानी, पोलिस निरीक्षक देविदास चोपडे, आयोजन समिती अध्यक्ष रेणुकादास वानखेडे, सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार मनोज किर्तने, डॉ. निरंजन केशवे, डॉ. राजेंद्र लोणे, तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, पत्रकार, नगरसेवक, समता सैनिक दल व क्रांतिज्योती महिला मंडळाचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले, तर प्रकाश गायकवाड यांनी आभार मानले. ‘भिम महोत्सव समिती, माहूर’चे आयोजक आकाश रमेश कांबळे व अर्जुन बरडे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

माहूर परिसरातील विविध गावांतून आलेल्या हजारो भीम सैनिकांच्या शिस्तबद्ध उपस्थितीमुळे आणि उत्स्फूर्त सहभागामुळे हा सोहळा ऐतिहासिक ठरला.

Previous Post

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्च रोजी राजापूर शहरात स्वच्छतेचा जागर

Next Post

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

Related Posts

Blog

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

February 25, 2026
7
Blog

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

February 25, 2026
0
निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड
Blog

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

February 25, 2026
0
धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्च रोजी राजापूर शहरात स्वच्छतेचा जागर
Blog

धर्माधिकारी प्रतिष्ठानच्यावतीने १ मार्च रोजी राजापूर शहरात स्वच्छतेचा जागर

February 24, 2026
11
बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल
Blog

बहुआयामी सामाजिक कार्याची शासनाकडून दखल

February 24, 2026
13
रमजान महिन्यात लोडशेडिंग टाळावे; पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन
Blog

रमजान महिन्यात लोडशेडिंग टाळावे; पत्रकार संरक्षण समितीचे निवेदन

February 24, 2026
4
Next Post
निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

ताज्या बातम्या

श्री रमेशजी रावळ यांची वयाच्या साठाव्या वर्षी ही रायगड मित्र मंडळा सोबत दुर्गभ्रमंती सुरूच !!

February 25, 2026

बस स्थानक परिसरात मोकाट सांडांचा मंगळवारी धुमाकूळ; निष्पाप जीव गेल्यावरच पालिकेला जाग येणार का?

February 25, 2026
निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

निझर येथील जगदीशभाई पटेल यांची राष्ट्रीय महामंत्रीपदी निवड

February 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • वझरे येथे बंद घर फोडून चोरीचा प्रयत्न; तिघांविरोधात गुन्हा दाखल

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In