◆ सकल मातंग समाजाची वज्रमुठ बांधणार सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते ◆
मा.सर्वोच्च न्यायालयाने दि.01 ऑगस्ट 2024 रोजी अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचा निर्णय दिला व तात्काळ अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण करण्याचे राज्य सरकारला आदेशीत केले. मात्र पावणे दोन महिने उलटूनही यांत कुठलीच अंमलबजावणी झाली नसल्याने काल छत्रपती संभाजीनगर शहरात सकल मातंग समाजाची व्यापक बैठक पार पडली व या बैठकीत अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाची तात्काळ अंमलबजावणी व्हावी यांसाठी शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी शहरातील ऐतिहासिक क्रांती चौकात “महाधरणे आंदोलन” करण्यांत येणार असल्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. या महाधरणे आंदोलनात समाजातील सर्वपक्षीय नेते व विविध संघटनांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व समाजबांधव सहभागी होणार असून शासनाला दखल घ्यायला भाग पाडले जाणार आहे. असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झालेल्या या बैठकीला अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाचे गाढे अभ्यासक अजितजी केसराळीकर यांनी आरक्षण उपवर्गीकरण या विषयांवर अत्यंत सविस्तरपणे व सखोलपणे मार्गदर्शन केले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या या बैठकीला अजितजी केसराळीकर यांचे सहित मातंग समाजाचे ज्येष्ठ नेते उत्तमरावजी कांबळे, डॉ.योगेश साठे, प्रमोद कांबळे, संदिप मानकर, संतोष पवार, राजु भालेराव, भाऊसाहेब काळुंके, सुवर्णाताई साबळे, विनायक वाघुले, ऍड. ज्ञानेश्वर गायकवाड, कचरु कांबळे, कल्पनाताई त्रिभुवन, राजेश त्रिभुवन, बबन घोरपडे, विलास खोतकर, गजानन मानकर, नितीन आव्हाड, मुकेश जाधव, मनोहर घुले, भरत मानकर, विजय कसारे, समाधान वाणी, उमेश नेमाडे, यशराज इंचाळकर, दिपक कसारे, रॉबिन्सन कसबे, सुनील जोगदंड, नाना गायकवाड, संजय कांबळे, विनोद आव्हाड, शशिकांत गोफने, राहुल घोरपडे, पवन मानवतकर, सुरेश चंदनशिव, अनिल दाभाडे, अक्षय जाधव, सागर नेमाडे, राजु लगड आदींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती..!
Discussion about this post