31 Total Views , 1 views today
(निळकंठ साने)ग्रामीण भागातील शासनाच्या विकासाचा पाया प्रशासकीय अधिकारी म्हणून जर कोण असेल तर त्या ग्रामपंचायतच्या ग्रामसेवक याच्या ग्रामसेवक यांची गेली अनेक वर्षापासून ची मागणी होती की ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी ही दोन्ही पदे एकच काम करत असल्यामुळे दोन्ही पदे रद्द करून व एवजी ग्रामपंचायत अधिकारी असे पदनाम करावे ग्रामसेवक सह वर्गावर गेले अनेक वर्ष निर्माण झालेली वेतन त्रुटी दूर करावी आणि या मागणीला महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक संघटना डी एन ई 136 ला यश आले आहे.
संघटनेच्या विनंतीला मान देऊन महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळ निर्णय करून ग्रामसेवक या पदाचे पदनाम ग्रामपंचायत अधिकारी असे केल्याने संघटने कडून फटाके वाजवित जल्लोष करण्यात आला यावेळी प्रमुख्याने जिल्हाध्यक्ष अनिल पवार तालुकाध्यक्ष उमेश मनवे तालुका सचिव किशोर गोपाल घरी ग्रामसेवक संघटनेचे सभासद विनय पाचाडकर दिलीप जोशी किशोर मेंडके संतोष मोरेविक्रम खुडे संतोष वालेकर शिल्पा कोंढाळकर त्रिशीला गंभीरे विद्या चव्हाण मेघना भोसले वर्षा पवार स्नेहल धोत्रे क्षमाली कांबळे श्री वाकले प्रवीण कुथे अमरदीप करमत उपस्थित होते.
बऱ्याच वर्षाची मागणी मान्य झाल्याने या सर्वांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवळे यांचे मनापासून आभार व्यक्त केले.
Discussion about this post