• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
मुलुंड येथे ‘कोकणी अवलिया’ विशेष संगीत मैफल; जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनाचा उपक्रम
0
SHARES
5
VIEWS
Ad 1

मुंबई : समाजातील ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याच्या उद्देशाने वांगणी येथील जिव्हाळा वृद्धाश्रमासाठी निधी संकलनार्थ ‘कोकणी अवलिया’ या विशेष संगीत मैफलीचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २२ मे २०२६ रोजी सायंकाळी ८.३० वाजता महाकवी कालिदास नाट्यमंदिर येथे संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध गायक सुनिल वाडकर यांची विशेष उपस्थिती असून, त्यांच्या आवाजात सादर होणारी बॉलिवूडमधील ५० गाण्यांची संगम मैफल रसिकांना सुरेल आनंद देणार आहे. त्यांच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम अधिक विशेष स्वरूपात साजरा केला जाणार आहे.

RelatedPosts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

कार्यक्रमाचे संगीत संयोजन राहुल जाधव (इंडियन आयडल फेम) यांच्या मार्गदर्शनाखाली होणार असून, सूत्रसंचालन श्रेया भ. करणार आहेत. तसेच त्यांच्या सादरीकरणामुळे कार्यक्रमाला वेगळा आयाम लाभणार आहे. या उपक्रमाचे आयोजन रफिज फॅन क्लब मुंबई आणि कोकण युवा सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

या सांगीतिक मैफलीतून उभारला जाणारा निधी जिव्हाळा वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांच्या निवास, आहार, औषधोपचार व दैनंदिन गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. सध्या येथे अनेक वृद्ध नागरिक वास्तव्यास असून त्यांच्या देखभालीसाठी सातत्याने आर्थिक मदतीची आवश्यकता भासत आहे.

कार्यक्रमासाठी ऑनलाईन तिकीट बुकिंगची सुविधा BookMyShow वर उपलब्ध आहे. तसेच डोनर पासेस, ग्रुप बुकिंग, प्रायोजकत्व व जाहिरातींसाठीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

समाजातील दानशूर व्यक्ती, संस्था आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन ज्येष्ठांच्या सेवेसाठी हातभार लावावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. “जिव्हाळा वृद्धाश्रम — माणुसकी जपण्याचा एक छोटासा प्रयत्न… चला, सर्वांनी मिळून सहकार्य करूया!” असेही आवाहन करण्यात आले आहे.

Previous Post

कल्पना नगर-विश्राम नगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी

Next Post

पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

Related Posts

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.
Blog

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
4
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात
Blog

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश
Blog

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026
3
Blog

भाजप परभणी महानगरच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत संघटन बळकटीकरणावर भर

September 5, 2026
2
जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण
Blog

जोशी वस्ती येथे भटके विमुक्त दिनानिमित्त जात प्रमाणपत्र व रेशन कार्ड खा.निलेश लंके यांचे हस्ते वितरण

September 5, 2026
9
‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐
Blog

‘माफदा’ (MAFDA – महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन) चे राज्य अध्यक्ष. विनोद रामदास तराळ, यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…. 🙏💐

September 5, 2026
6
Next Post
पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

पिंपरी पेंढार येथे श्री चारंगबाबा यात्रा उत्सव उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

पावसाळा सुरू होऊन तीन महिने झाले तरी अहमदपूर तालुक्यात सरासरीच्या तुलनेत अत्यंत कमी पाऊस झालेला असून मोठ्या प्रमाणात पावसाची तूट निर्माण झाली आहे.

September 5, 2026
विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

विद्या मंदिर गुडाळवाडी शाळेत दहीहंडी उत्साहात

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडचिरोलीत जमावबंदी; जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

September 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In