• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
April 22, 2026
in Blog
0
जळगाव क्रिकेट लीगचा भव्य शुभारंभ; मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॉफीचे अनावरण
0
SHARES
17
VIEWS
Ad 1

जळगाव, दि. १८ (प्रतिनिधी) : जळगाव क्रिकेट लीग (JCL) स्पर्धेचे शानदार उद्घाटन शनिवारी संध्याकाळी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाला राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, माजी मंत्री सुरेशदादा जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली. आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंद्रकांत सोनवणे, किशोर पाटील, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, संचालक अतुल जैन तसेच इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विविध संघांच्या मालकांचा सत्कार करण्यात आला. जळगाव कोगटा किंग्जचे अतुल कोगटा, जामनेर सातपुडा हिरोजचे किरण बच्छाव, चाळीसगाव चॅलेंजर्सचे संजय भावसार, रावेर रॉयल्सचे महावीर जैन, अमळनेर सुहांस जायंट्सचे संदीप काबरा आणि पाचोरा एसकेटी योद्धाजचे हेमंत कोठारी यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

RelatedPosts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

प्रास्ताविकात अतुल जैन यांनी २०१९ मध्ये झालेल्या JCL मधून अनेक खेळाडूंनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली छाप पाडल्याची माहिती दिली. ग्रामीण भागातील खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जैन ड्रीम स्पेसेसच्या क्रीडांगणावर आधुनिक पायाभूत सुविधा उभारण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी स्पेक्ट्रमच्या अलरीक इलेक्ट्रिक्सच्या नवीन दालनालाही मान्यवरांनी भेट देत विविध उत्पादने लाँच केली.

यावेळी माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी आपल्या क्रिकेटमधील आठवणींना उजाळा दिला. “मी इंदूर येथे असताना रणजी संघात निवड झाली होती. विद्यापीठ स्तरावर अनेक सामने खेळलो. आता जळगावात अशोकभाऊ आणि अतुलभाऊ यांनी ग्रामीण खेळाडूंना उत्तम संधी उपलब्ध करून दिली आहे,” असे ते म्हणाले.

तर मंत्री गिरीश महाजन यांनी मैदानाच्या गुणवत्तेचे कौतुक करत “हे मैदान वानखेडे स्टेडियमपेक्षाही सरस आहे. यामुळे जळगावातून उत्कृष्ट खेळाडू घडतील,” असा विश्वास व्यक्त केला. त्यांनी आपल्या शालेय जीवनातील कुस्ती आणि कबड्डीतील सहभागाचाही उल्लेख केला.

कार्यक्रमाच्या शेवटी जळगाव क्रिकेट लीगच्या अंतिम सामन्यातील विजेत्याला दिल्या जाणाऱ्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. संपूर्ण वातावरणात उत्साहाचे आणि क्रीडामय आनंदाचे रंग भरले होते.

Previous Post

मळद येथे खरीप हंगाम २०२६-२७ पूर्वतयारी शेतकरी बैठक उत्साहात संपन्न

Next Post

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता

Related Posts

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;
Blog

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
16
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.
Blog

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
20
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी
Blog

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026
5
खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा
Blog

खटाव तालुक्यातील निमसोड गावचे नेते राष्ट्रीय काँग्रेसचे सातारा जिल्ह्याचे माझी जिल्हाध्यक्ष रणजीत सिंह धैर्यशील देशमुख उर्फ भैय्यासाहेब यांच्या वडिलांचा११ वे पुण्यस्मरण सोहळा

September 4, 2026
3
वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात
Blog

वरवणे आश्रमशाळेत रानभाज्या महोत्सव उत्साहात

September 4, 2026
17
Blog

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित फलटण सहाय्यक अभियंता वैभव बारवकर यांचा दिलदार तसेच मनमिळावू स्वभाव

September 4, 2026
15
Next Post
भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता

भडगाव तालुक्यात तलाठी व मंडळ अधिकारी बेमुदत संपावर; महसूल सेवा ठप्प होण्याची शक्यता

ताज्या बातम्या

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

मानवत तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७० हजारांची मदत द्या;

September 4, 2026
एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

एम.एस.जी.एस. इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये शिक्षक दिन व दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा.

September 4, 2026
सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

सिडकोच्या घरांची किंमत अडीच लाखांनी कमी होणार; खारघर, कळंबोली व तळोजातील विजेत्यांसाठी सुवर्णसंधी

September 4, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In