• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

देवगाव शनी गायरान प्रकरणी रवींद्र पवार यांचे आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; मागण्या न मानल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 8, 2026
in Blog
0
0
SHARES
75
VIEWS
Ad 1

वैजापूर | प्रतिनिधी

देवगाव शनी येथील गायरान जमीन (गट क्रमांक २१) परिसरातील कथित अवैध उत्खनन प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पवार यांनी मंगळवारी (दि. ७ जुलै) सकाळी साडेदहा वाजता भर पावसात सुरू केलेले आमरण उपोषण तात्पुरते स्थगित केले आहे. मात्र, मागण्यांवर समाधानकारक कार्यवाही न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

RelatedPosts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

उपोषणादरम्यान पवार यांनी गट क्रमांक १८ साठी देण्यात आलेल्या रॉयल्टीची सर्व कागदपत्रे, मायनिंग मॅपिंगद्वारे मोजणी, ईटीएस अहवाल तसेच महसूल विभागाकडून झालेल्या कथित दिरंगाईची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच तक्रारीनंतर आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचाही आरोप त्यांनी केला.

याशिवाय, हजारो ब्रास मुरूम उत्खनन झाल्याचा दावा करत असताना महसूल प्रशासनाने केवळ ५० ब्रास उत्खननाची नोंद कशी केली, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

गोदावरी नदीला पूर आल्यास संबंधित गटांतील खड्डे बुजण्याची शक्यता असून त्यापूर्वी योग्य मोजणी व तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. मागण्यांवर योग्य निर्णय न झाल्यास देवगाव शनी येथील गायरान जमिनीवर पुन्हा बेमुदत आमरण उपोषण करण्यात येईल, तसेच संपूर्ण प्रकरणाची माहिती राज्याचे महसूल मंत्री यांच्याकडे पाठविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Previous Post

अयोध्या नगर–समर्थ नगर रस्त्यावरील नाली जीवघेणी; नागरिकांचा ठेकेदारावर अरेरावीचा आरोप

Next Post

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

Related Posts

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न
Blog

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
4
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन
Blog

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026
7
छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली
Blog

छत्रपती संभाजीनगरात भीषण अपघात; दुचाकीचे दोन तुकडे, सुरक्षा भिंतही तुटली

October 5, 2026
11
सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश
Blog

सौंदड उड्डाणपुलाच्या कामाला वेग; ८ ऑक्टोबरला वाहतूक सुरू करण्याचे निर्देश

October 5, 2026
17
बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार
Blog

बोरीत नाल्या तुंबल्या; स्वच्छतेसाठी महिलांनीच घेतला पुढाकार

October 5, 2026
7
झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी
Blog

झोडगाव येथे सोयाबीन-कापूस नुकसानीची पाहणी; १०० टक्के नुकसानभरपाईची मागणी

October 5, 2026
214
Next Post

सांगली जिल्हा बँक भरतीवरील स्थगिती न्यायालयाकडून रद्द; अर्जासाठी १० जुलैपर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

पेणच्या ‘जोहेचा राजा’चा महाआरती सोहळा दिमाखात संपन्न

October 5, 2026
रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

रात्रीस चाले ‘ड्रोन’चा खेळ! चांदवड तालुक्यात नागरिक भयभीत; ‘ड्रोन कुणाचे?’ प्रशासनासमोर सवाल

October 5, 2026
मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

मविप्र महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब जयकर व्याख्यानमालेच्या प्रथम पुष्पाचे उद्घाटन

October 5, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In