तुळजापूर | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील अनदूर येथील जवाहर विद्यालयात पालक सभा उत्साहात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त मुख्याध्यापक करंडे गुरुजी होते, तर सुभाष लंगडे सर आणि चंद्रकांत गुड पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला प्रारंभ झाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित पालक व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
पालक सभेत नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत, सेमी इंग्रजी वर्गातील प्रवेश, स्पर्धा परीक्षा, दहावी-बारावीचा निकाल, अतिरिक्त तासांचे नियोजन, विविध समित्यांचे कार्य, तसेच विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी शाळेत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांसह विविध शैक्षणिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
मुख्याध्यापक गोपाळ कुलकर्णी, मकरंद पाटील, मोरे सर आणि मसुदे सर यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. यावेळी पालकांनी मांडलेल्या सूचना व अपेक्षांवरही मुक्त संवाद साधून सकारात्मक चर्चा करण्यात आली.
सभेला शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्या अनिता कबाडे, मकरंद पाटील, चंद्रकांत गुड, सारणे, गंगाराम चिंचोळे, वैशाली करपे यांच्यासह मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोरे सर यांनी केले, तर मसुदे सर यांनी उपस्थितांचे आभार मानले.


