• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
November 29, 2026
in Blog
0
नागझरी येथे श्रमदानातून जलसंधारणाची कामे; दोन माती बंधारे आणि १० समतल चरांची निर्मिती
0
SHARES
0
VIEWS
Ad 1
Ad 1

स्व. पंढरीनाथ इप्पर शेतकरी गटाचा उपक्रम; एका पावसात तीन लाख लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार

अहमदपूर | प्रतिनिधी :

अहमदपूर तालुक्यातील नागझरी येथे ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून स्व. पंढरीनाथ इप्पर शेतकरी गटाने श्रमदानाद्वारे जलसंधारणाची कामे केली आहेत. पाणी फाऊंडेशनच्या फार्मर कप स्पर्धेत सहभागी झालेल्या या गटाने सामूहिक प्रयत्नांतून दोन माती बंधारे बांधले असून १० समतल चर (सीसीटी) खोदले आहेत.

RelatedPosts

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

पाणी फाऊंडेशन, कृषी विभाग आणि उमेद अभियान यांच्या प्रशिक्षण व मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन गटातील शेतकऱ्यांनी जैविक तसेच कमी खर्चाच्या शेती पद्धतीचा अवलंब केला आहे. भविष्यातील पाणीटंचाई आणि दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन जलसंधारणाची कामे श्रमदानातून करण्यात आली.

या कामांमुळे एका पावसात सुमारे तीन लाख लिटर पाणी जमिनीत मुरण्यास मदत होणार आहे. त्यामुळे भूजलपातळी वाढणे, जमिनीतील ओलावा टिकून राहणे आणि पिकांसाठी पाण्याची उपलब्धता वाढणे अपेक्षित आहे.

याशिवाय यंत्राच्या साहाय्याने बांधण्यात आलेल्या दगडी नाला बांधाच्या पिचिंगचे कामही श्रमदानातून करण्यात आले. या उपक्रमात शेतकरी गटातील सर्व सदस्यांनी आपल्या पत्नींसह सहभाग घेतला. महिला आणि पुरुषांनी एकत्रितपणे श्रमदान करून जलसंधारणाच्या कामात योगदान दिले.

या उपक्रमात संजय इप्पर, ज्ञानोबा इप्पर, बालाजी इप्पर, गोपीनाथ इप्पर, गणेश इप्पर, विठ्ठल इप्पर, भास्कर इप्पर, प्रकाश इप्पर, हनुमंत इप्पर, तुकाराम मुंढे, मारुती इप्पर, गणेश आलापुरे आणि विश्वनाथ इप्पर यांनी सहभाग नोंदविला.

या कामासाठी पाणी फाऊंडेशनचे तालुका प्रतिनिधी ओम कुरडे आणि कृषी विभागाचे मेंटर हणमंत टोकले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

गावातील पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. भविष्यातही जलसंधारणाची कामे सातत्याने सुरू ठेवण्याचा निर्धार शेतकरी गटाने व्यक्त केला आहे.

Ad 1
Tags: Satish Malshtte
Previous Post

तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात आसलगावच्या शाळेची दुहेरी बाजी

Next Post

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

Related Posts

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी
Blog

मऱ्हळ बुद्रुक येथे मेगा आरोग्य शिबिर; २०६ नागरिकांची तपासणी

November 29, 2026
17
माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार
Blog

माणकेश्वर येथे प्रशिक्षणासाठी आलेल्या सनदी अधिकाऱ्यांचा ग्रामपंचायतीतर्फे सत्कार

November 29, 2026
1
करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी
Blog

करपडी फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको; शेतीपंपांचा आठ तास वीजपुरवठा देण्याची मागणी

November 28, 2026
12
Auto Draft
Blog

गंगापूर येथे दोन कारची समोरासमोर धडक; आष्टीच्या विद्या जोशी यांचा मृत्यू

November 28, 2026
17
पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी
Blog

पेढेवाडीत आगीत पाच घरांचे नुकसान; सुमारे १७ लाख रुपयांची हानी

November 28, 2026
25
विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’
Blog

विरारमध्ये १९ व २० डिसेंबरला रंगणार ‘पवई पंचक्रोशी चॅम्पियन ट्रॉफी २०२६’

November 28, 2026
170
Next Post
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

ताज्या बातम्या

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

मालेगाव तालुक्यात बालकांची मोफत आरोग्य तपासणी; गरजेनुसार शस्त्रक्रियेचीही सुविधा

November 29, 2026
बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

बुलढाण्यात ४ डिसेंबरला दुष्काळ महाएल्गार मोर्चा

November 29, 2026
निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

निधीची मागणी फेटाळल्यानंतर नगरसेविकेने स्वखर्चातून सुरू केले तीन बोअर

November 29, 2026

Popular Stories

  • शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    शिरूर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष मितेश गादियांविरोधातील अविश्वास ठराव २० मतांनी मंजूर!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In