• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

‘साडेतीन किलो सोन्याचा माठ’ सांगून १५ लाखांची फसवणूक; बनावट नाणी देऊन आरोपी फरार

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
40
VIEWS
Ad 1

पातूर | प्रतिनिधी :

RelatedPosts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

घर पाडताना साडेतीन किलो सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे आमिष दाखवत कोल्हापूर येथील एका व्यावसायिकाची तब्बल १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज चांदोबा कांबळे (वय ४९, रा. वडणगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर) यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. तर गणेश रमेश इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपीची फिर्यादीशी यापूर्वी एका हॉटेलमध्ये ओळख झाली होती. त्यानंतर ३० जून २०२६ रोजी आरोपीने फोन करून आपल्या बहिणी व मेहुण्याला घर पाडताना साडेतीन किलो वजनाचा सोन्याच्या नाण्यांचा माठ सापडल्याचे सांगितले. हा माल ५० लाख रुपयांत विकण्याची तयारी असल्याचे सांगून त्याने फिर्यादीला आमिष दाखवले.

विश्वास संपादन करण्यासाठी आरोपीने फिर्यादीला एक सोन्याचे नाणे दिले. ते नाणे सोनाराकडे तपासणीसाठी दिल्यानंतर ते खरे सोने असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे आरोपीवर विश्वास ठेवून फिर्यादीने ४ जुलै २०२६ रोजी अकोला जिल्ह्यातील नांदखेड फाटा (ता. पातूर) येथे आरोपीला रोख १५ लाख रुपये दिले.

बदल्यात आरोपीने ३ किलो ३०० ग्रॅम वजनाची नाणी दिली. मात्र, पुढील तपासणीत ही सर्व नाणी बनावट असल्याचे उघड झाले. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पातूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून एएसआय चव्हाण यांनी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय मेश्राम करीत आहेत.

सूचना: कोणत्याही मौल्यवान वस्तू, सोने किंवा पुरातन वस्तू स्वस्तात मिळण्याचे आमिष दाखवून होणाऱ्या व्यवहारांबाबत नागरिकांनी योग्य पडताळणी करूनच आर्थिक व्यवहार करावेत, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Tags: Pramod dongre
Previous Post

मारेगावला जातो सांगून गेलेले नितेश गेडेकर बेपत्ता; माहिती देण्याचे आवाहन

Next Post

एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव; ड्रोन सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी रोखले

Related Posts

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥
Blog

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026
3
Blog

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
5
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी
Blog

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026
70
सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार
Blog

सप्ताहाची सांगता; सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून विकास करणार

August 25, 2026
11
“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”
Blog

“वर्गात दिसतो तो शिक्षक… पण वर्गाबाहेर जगतो तो एक संघर्ष!”

August 25, 2026
48
सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या
Blog

सीमेवरील जवानांसाठी सावर्डे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पाठवल्या स्वनिर्मित राख्या

August 25, 2026
3
Next Post

एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव; ड्रोन सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी रोखले

ताज्या बातम्या

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

॥शिष्यवृत्ती गुणवंतांचा गौरव: मार्गदर्शक शिक्षकांचाही सन्मान ॥

August 25, 2026

साखरेच्या वाढलेल्या दराच्या तुलनेत ऊस उत्पादकांना योग्य दराची मागणी; साखर संकुलावर तीव्र आंदोलन

August 25, 2026
अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

अंतेश्वर बंधाऱ्यात बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाच्या पाचपट मोबदला देण्याची मागणी

August 25, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In