• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

एमआयडीसी जमीन अधिग्रहणावरून मुधोली चक क्र. २ मध्ये तणाव; ड्रोन सर्वेक्षण पथकाला ग्रामस्थांनी रोखले

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 10, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1
Ad 1

चामोर्शी | प्रतिनिधी

RelatedPosts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक क्र. २ येथे एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाच्या मुद्द्यावरून पुन्हा तणाव निर्माण झाला आहे. अधिग्रहण प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती असल्याचे सांगितले जात असतानाही ड्रोनद्वारे जमिनीचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या पथकाला संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसीसाठी प्रस्तावित जमीन अधिग्रहणाला मुधोली चक क्र. २ येथील शेतकरी सुरुवातीपासूनच विरोध करत आहेत. शेतकऱ्यांच्या आक्षेपानंतर प्रशासनाने अधिग्रहण प्रक्रियेला तीन महिन्यांची स्थगिती दिल्याची माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही ड्रोनच्या माध्यमातून जमिनीचे सर्वेक्षण व मोजणी करण्यासाठी पथक दाखल झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला.

शेतकरी आणि ग्रामस्थांनी संबंधित पथकाला ग्रामपंचायत कार्यालयात रोखून धरत, स्थगिती लागू असताना सर्वेक्षण करण्याचे आदेश कोणत्या स्तरावरून देण्यात आले, याबाबत स्पष्टीकरण मागितले. तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता कोणतीही मोजणी किंवा सर्वेक्षण करण्याचा प्रयत्न झाल्यास तीव्र विरोध करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला.

घटनेची माहिती मिळताच तहसीलदारांसह पोलीस प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अधिकाऱ्यांनी शेतकरी प्रतिनिधींशी चर्चा करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने तातडीने कोणताही तोडगा निघू शकला नाही. यावेळी ग्रामपंचायत परिसरात महिला व पुरुष शेतकऱ्यांची मोठी उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी स्पष्ट भूमिका घेत अधिग्रहणाबाबत प्रशासनाचा अधिकृत निर्णय जाहीर होईपर्यंत कोणत्याही प्रकारचे ड्रोन सर्वेक्षण, मोजणी किंवा पुढील प्रक्रिया होऊ देणार नाही, असे सांगितले.

दरम्यान, जमीन अधिग्रहणाचा विषय आधीपासूनच संवेदनशील बनला असून प्रशासन आणि शेतकरी यांच्यातील संवादाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. आता या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर होणाऱ्या निर्णयाकडे परिसराचे लक्ष लागले आहे.

शेतकऱ्यांचा सवाल :
“अधिग्रहण प्रक्रियेला स्थगिती असताना ड्रोनद्वारे जमिनीची मोजणी करण्याचा प्रयत्न नेमका कोणाच्या आदेशाने करण्यात आला?” असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित करत प्रशासनाने याबाबत पारदर्शक भूमिका घ्यावी आणि शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे, अशी मागणी केली आहे.

Ad 1
Previous Post

‘साडेतीन किलो सोन्याचा माठ’ सांगून १५ लाखांची फसवणूक; बनावट नाणी देऊन आरोपी फरार

Next Post

विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा – युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत

Related Posts

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!
Blog

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
7
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी
Blog

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
7
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..
Blog

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026
3
औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?
Blog

औरंगाबाद पदवीधर रणधुमाळीत राजकीय भूकंप..?

October 11, 2026
49
शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड
Blog

शारदीय नवरात्र महोत्सव साठेवाडी ता.गेवराई जिल्हा बीड पायी ज्योत सोहळा श्री वरदान मानाई देवी मंदिर दहिवली बुद्रुक चिपळूण ते साठेवाडी बीड

October 11, 2026
38
दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा
Blog

दुसरबीड ग्रामदैवत तळ्याच्या आईच्या दरबारात घटस्थापना उत्साहात, गजेंद्र देशमुख सपत्नीक दाम्पत्याच्या हस्ते विधिवत पूजा

October 11, 2026
3
Next Post

विद्यार्थ्यांनी निसर्ग संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी; पर्यावरण संरक्षणासाठी पुढाकार घ्यावा – युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत

ताज्या बातम्या

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

चामोर्शी–लखमापूर बोरी मार्गावर चार जनावरांची वाहतूक; वाहन ताब्यात, चालक फरार!

October 11, 2026
सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

सावर्डे विद्यालयाच्या खेळाडूंची मैदानी स्पर्धेत दमदार कामगिरी

October 11, 2026
कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

कर्मवीर सहकारी शंकरराव काळे कारखान्याचा गळीप हंगाम कार्यक्रम संपन्न…..

October 11, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In