शिरूर अनंतपाळ. /वाल्मीक सूर्यवंशी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी व पक्ष बळकटीकरणासाठी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांची मशाल पेटवून गद्दारांना त्यांची जागा दाखविण्यासाठी शिवसैनिकांनी व पदाधिकाऱ्यांनी सजग रहावे आणि येत्या विधानसभेत भगवा फडकाविण्यासाठी महाविकास आघाडीचे पाठबळ म्हणून सजग रहावे असे प्रतिपादन निलंगा येथे शिवसैनिकांचा बुथ मेळावा व स्त्री शक्ती संवाद अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेची तोफ उपनेत्या सुषमाताई अंधारे बोलत होत्या.
शिवसेना पक्षाच्या वतीने निलंगा येथील केतकी मंगल कार्यालयात रविवार (दि २९) रोजी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्त्री शक्ती संवाद व शिवसैनिकांचा बुथ मेळावा उत्साहात संपन्न झाला.या कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करुन मेळाव्याची सुरुवात करण्यात आली.
व्यासपीठावर उपनेत्या पक्षनिरीक्षक अस्मिता गायकवाड, संपर्कप्रमुख आमदार रोहीदास चव्हाण, सहसंपर्कप्रमुख संतोष सोमवंशी, जिल्हाप्रमुख दिनकर माने, ज्येष्ठ शिवसैनिक लिबन महाराज रेशमे, लातूर जिल्हा महिला संघटिका शोभा बेंजरगे, उपजिल्हाप्रमुख बजरंग जाधव, महिला संपर्कप्रमुख संपताताई गडीकर, जयश्रीताई उटगे, नगरसेविका राधिनी शिवणे, विधानसभा संपर्कप्रमुख सुनील वेंगुर्लेकर, युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे, श्रध्दा जवळगेकर, रामलिंग पटसाळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सुषमा अंधारे म्हणाल्या, सर्वात महत्त्वाचं ज्या सत्ताधारी पक्षाचे मंत्री हे आपल्याच पक्षप्रमुखांची गद्दारी करून सत्तेच्या हव्यासपोटी पक्ष सोडून जातात व इतर पक्षाच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत चिन्ह सुद्धा मिळवुमन घेतात अशा लोकांना आता महाराष्ट्रातील जनताच जागा दाखविल्याशिवाय सोडणार नाही त्यामुळे शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुखांचे आदेश येतात सतर्कपणे जागे राहून मागील दोन वर्षापासून लोकांना दिशाभूल करत फक्त खोटी आश्वासन देत सत्तेचा दुरुपयोग करत स्वार्थ साधनेचे काम करणाऱ्या गद्दारांना जागा दाखविण्यासाठी सजग राहावे. तसेच शिवसेना पक्ष व चिन्ह चोरले तरी नवीन चिन्हावर झालेल्या अंधेरी पोटनिवडणूक ते लोकसभा व आताच झालेल्या सिनेट निवडणुकीत जनतेने उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला भरपुर प्रेम देत आजही शिवसेना संपलेली नाही हे दाखवून दिले आहे.
सध्या राज्यातील लोकांना आज रोजी महाराष्ट्र राज्यातील परीस्थिती पाहून ती मनाला आवडणारी नसल्यामुळे लोकांनी पुन्हा हे सिध्द करुन दाखवले. राज्यात सध्या अनेक संघटनांचे व समाजांचे विविध मागण्यांसाठी आंदोलने सुरु आहेत ते सर्व आंदोलने हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी सध्या फक्त सत्तेचा वापर करून फक्त स्वार्थ साधण्यासाठी धडपडत असल्याचे दिसून येत असल्यामुळें राज्यात महिला,मुली सुरक्षित नाहीत. पोलिसांना स्वतंत्र अधिकार मिळत नसल्यामुळे पोलीसांचाही धाक राहीला नाही. कारण सत्ताधारी आमदारच पोलिसांना धमकी देऊन जाहीरपणे अपराध करण्यासाठी दबाव देत असल्याचे प्रकार घडत आहेत.
आणि हे सर्व प्रकार जनता बोलुन दाखवत नसली तरी ते त्यांच्या मनात तग धरुन आहे. महाराष्ट्रात कधी जातीपातीचे राजकारण झाले नव्हते. मात्र सध्या एखाद्या समाजाला टारगेट करुन राजकारण केले जात आहे हि पुरोगामी महाराष्ट्राला न शोभणारी बाब आहे. हे बदलण्यासाठी महाराष्ट्रातील जनतेने उध्दव ठाकरे व महाविकास आघाडीच्या पाठीशी राहावे, असे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्याचे प्रस्ताविक तालुकाप्रमुख अविनाश रेशमे यांनी केले तर सुत्रसंचलन उपजिल्हाप्रमुख हरीभाऊ सगरे यांनी केले. याप्रसंगी शिरुर-अनंतपाळ तालुकाप्रमुख भागवत वंगे, देवणी तालुका प्रमुख मुकेश सुडे, निलंगा शहरप्रमुख सुनील नाईकवाडे, युवा सेना उपजिल्हा प्रमुख आण्णासाहेब मिरगाळे , संतोष मोघे, अमोल ढोरसिंगे, लखन बोंडगे , दैवत सगर, प्रदीप पाटील, अमोल कोळकर, प्रसाद मठपती आदीसह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौकटजवळच्या लोकांनी उध्दव ठाकरेंना धोका दिला आणि सत्तेच्या हव्यासापोटी गद्दारी केली: लिंबन महाराज रेशमे…सामान्य शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे अस्तित्व निर्माण करुन देत मोठ मोठी पदे दिली. अनेकांना नगरसेवक, आमदार, खासदार ते मंत्री केले. नगरविकास सारखे खाते दिले. मात्र काही लोकांनी उपकाराची जाणिव न ठेवता धोका देण्याचे काम केले.
आज नेते जरी पक्ष सोडून गेले असले तरी खरा शिवसैनिक आजही उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी उभा आहे अन् तो शिवसैनिक गद्दांरांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, असे लिंबन महाराज यांनी बोलताना सांगितले निलंगा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आणि हा मतदारसंघ हा पुर्वीपासून शिवसेनेचाच आहे मात्र भाजपवाल्यांनी शिवसैनिकांचे खच्चिकरण करत वू हा मतदारसंघ भाजपाच्याच ताब्यात ठेवत गेले मात्र हा मतदारसंघ पुन्हा शिवसेनेला सोडवून घ्यावा, असे साकडे घातले.
Discussion about this post