• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आषाढी एकादशीनिमित्त दोंडाईचाहून पंढरपूरसाठी विशेष एसटी बससेवा सुरू

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
7
VIEWS
Ad 1
Ad 1

दोंडाईचा | प्रतिनिधी | सारथी महाराष्ट्राचा न्यूज

आषाढी एकादशीनिमित्त दोंडाईचा व परिसरातील वारकरी भाविकांच्या सोयीसाठी दोंडाईचा आगारातून पंढरपूरसाठी विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष बसच्या पहिल्या फेरीत ४० प्रवाशांनी पंढरपूरकडे प्रस्थान केले.

RelatedPosts

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

या बससेवेच्या शुभारंभप्रसंगी लोकनेते सरकार साहेब रावल, नगरसेवक प्रविण महाजन, आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी सरकार साहेब रावल यांनी सांगितले की, आषाढी एकादशीनिमित्त लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात. अनेक वारकरी दिंड्यांमधून पायी वारी करतात, तर ज्येष्ठ नागरिक बससेवेचा लाभ घेतात. त्यांच्यासाठी ही विशेष बससेवा सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात आली आहे. ७५ वर्षांवरील वारकऱ्यांना संपूर्ण मोफत प्रवास, तर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना ५० टक्के सवलतीत प्रवास करता येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच वारकऱ्यांनी प्रवासादरम्यान आरोग्याची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

नगरसेवक प्रविण महाजन यांनी सांगितले की, मा. ना. जयकुमार भाऊ रावल यांच्या माध्यमातून दोंडाईचा आगारासाठी ‘जिजाऊ’ आणि वातानुकूलित विजेवर चालणाऱ्या ‘शिवाई’ बसेस उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. तसेच भविष्यात लांब पल्ल्याच्या बससेवा सुरू करण्याबरोबरच ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी शटल बससेवा सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

आगार व्यवस्थापक मिलिंद परदेशी यांनी सांगितले की, पंढरपूर यात्रेसाठी किमान ४० प्रवाशांचा गट तयार झाल्यास त्यांच्या गावापर्यंत बस पाठवून परतीच्या प्रवासातही त्यांना गावात सोडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिफ्ट प्रमुख नरेंद्र भाबड यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगेश शिंगाणे, सौ. सुवर्णा कळसकर, हंसराज ठाकरे, जगदीश पाटील, रणजित बागुल, नरेंद्र गिरासे, आसावरी भामरे, देविदास रोकडे, गिरी मॅडम, घनश्याम शर्मा, प्रविण उमप, तानाजी सोनटक्के आदींनी सहकार्य केले.

Ad 1
Previous Post

पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील धोकादायक खड्डे तातडीने बुजवा; भाजप शहराध्यक्ष महेश निकम यांची मागणी

Next Post

उन्हाच्या झळांनी वारकऱ्यांची दमछाक; पाटस–बारामती वारी मार्गावर सावलीच्या झाडांचा अभाव

Related Posts

Blog

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
31
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान
Blog

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026
16
Blog

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026
15
माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.
Blog

माढेळी येथे प्रियदर्शनी पतसंस्थेचा रौप्य महोत्सव कार्यक्रम उत्साहात संपन्न;.

October 14, 2026
8
चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन
Blog

चिचोंडी पाटील येथे प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या शाखेचे उत्साहात उद्घाटन

October 14, 2026
45
२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.
Blog

२५० कुटुंबांचे हक्काच्या घराचे स्वप्न सिडकोच्या गृहप्रकल्पातील उत्पन्नाच्या अटी आणि न्यायालयीन वादामुळे अंधाऱ्यात आले आहे.

October 14, 2026
3
Next Post

उन्हाच्या झळांनी वारकऱ्यांची दमछाक; पाटस–बारामती वारी मार्गावर सावलीच्या झाडांचा अभाव

ताज्या बातम्या

मनमाडच्या शिवनेरी नगरात सप्तशृंगी देवीची स्थापना; नवरात्रोत्सवाला भक्तिमय सुरुवात

October 14, 2026
धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

धामोरीचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अँकर प्रदीप आहिरे यांना लोककवी वामनदादा कर्डक पुरस्कार प्रदान

October 14, 2026

पाणी जपून वापरा, अपव्यय टाळा: अपर जिल्हाधिकारी दादासाहेब गिते यांचे नागरिकांना आवाहन

October 14, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In