• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

जिजाऊ मेमोरियल महाविद्यालयात महाकवी कालिदास जयंती उत्साहात साजरी; साहित्य व संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 16, 2026
in Blog
0
0
SHARES
18
VIEWS
Ad 1

लोहारा | प्रतिनिधी :

लोहारा शहरातील जिजाऊ मेमोरियल प्रशासकीय सेवा महाविद्यालयात बुधवारी (१५ जुलै) भारतीय संस्कृत साहित्याचे महान सम्राट महाकवी कालिदास यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. पालक प्रतिनिधी सुधाकर चव्हाण आणि सतीश आरणकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले.

RelatedPosts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

यावेळी उपप्राचार्य यशवंत चंदनशिवे यांनी महाकवी कालिदास यांच्या जीवनकार्याचा आणि साहित्याचा सविस्तर परिचय करून दिला. त्यांनी सांगितले की, जर्मनीचे महान विचारवंत गटे यांनी कालिदासांचे अभिज्ञानशाकुंतलम् वाचल्यानंतर त्यांच्या प्रतिभेचे मुक्तकंठाने कौतुक केले होते. कालिदास हे भारतीय संस्कृत साहित्याचे सर्वोच्च कवी असून त्यांच्या साहित्यामध्ये भारतीय संस्कृती, प्रेम, त्याग आणि जीवनमूल्यांचे उत्कृष्ट दर्शन घडते.

चंदनशिवे यांनी पुढे सांगितले की, रघुवंश आणि कुमारसंभव ही त्यांची महाकाव्ये, मेघदूत व ऋतुसंहार ही खंडकाव्ये तसेच अभिज्ञानशाकुंतलम्, विक्रमोर्वशीयम् आणि मालविकाग्निमित्रम् ही अजरामर नाटके आजही साहित्यविश्वात मानाचे स्थान राखून आहेत. युवा पिढीने कालिदासांचे साहित्य वाचून भारतीय संस्कृती, प्रेम आणि त्यागाची मूल्ये आत्मसात करावीत, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका जमादार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रमेश गिराम यांनी केले.

यावेळी प्रा. प्राजक्ता लकडे, वैष्णवी लोहार, सौ. राणी माटे, सुयश चव्हाण, सिद्धार्थ सोनवते, विठ्ठल भोंडवे, कृष्णा पाटील, शीतल माटे तसेच महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

ई-पीक पाहणीत मोठा बदल; आता शेतकऱ्यांना स्वतः नोंदणी करता येणार नाही

Next Post

लातूरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

Related Posts

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान
Blog

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
17
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान
Blog

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
15
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ
Blog

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026
63
कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!
Blog

कर्तव्यनिष्ठ सेवेला गौरवपूर्ण सलाम!

August 31, 2026
1
नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला
Blog

नितीन राठोड खटाव तालुक्यातील पिंपरी येथे मारुती मंदिर कलशारोहण सोहळा झाला

August 31, 2026
12
Blog

आचार्य टाकळी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्याची तयारी

August 31, 2026
30
Next Post

लातूरातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचे निधन; वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

ताज्या बातम्या

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

चांदवड पंचायत समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन; ३७ दात्यांचे उत्स्फूर्त रक्तदान

August 31, 2026
ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

ऋतुध्वज सोशल फाउंडेशन च्या वतीने शिष्यवृत्तीधारक मुलांचा गुणगौरव व भेटवस्तू देऊन सन्मान

August 31, 2026
असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

असुर्डे विद्यालयाचे आदर्श शिक्षक भानुदास देसाई यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ

August 31, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In