• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

आंबेगाव पूर्व व चाकण भाजप मंडळाची संयुक्त संघटनात्मक बैठक; नवीन कार्यकारिणी जाहीर, विविध विषयांवर चर्चा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
11
VIEWS
Ad 1
Ad 1

चाकण | प्रतिनिधी :

भारतीय जनता पार्टीच्या आंबेगाव पूर्व व चाकण मंडळाची संयुक्त संघटनात्मक आढावा बैठक चाकण येथे उत्साहात पार पडली. बैठकीत नवीन मंडळ कार्यकारिणीची घोषणा, पदवीधर मतदार नोंदणी अभियान, रक्तदान शिबिराचे नियोजन, शेतकरी कर्जमाफीचा आढावा तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीसह विविध संघटनात्मक विषयांवर चर्चा करण्यात आली.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

ही बैठक भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र (दादा) चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे उत्तर मावळ जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली.

कार्यक्रमाच्या प्रारंभी आंबेगाव पूर्व मंडळाचे अध्यक्ष किरण बाबाजी वाळुंज यांनी मंडळाच्या कामाचा आढावा सादर केला. त्यानंतर पुणे उत्तर मावळचे महामंत्री डॉ. ताराचंद कराळे यांनी संघटनात्मक विषयांवर मार्गदर्शन केले. जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद यांनी प्रत्येक बूथ सक्षम करून पक्षाची विचारधारा जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आणि आगामी निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहण्याचे आवाहन केले.

बैठकीत राहुल गव्हाणे यांनी पदवीधर मतदार नोंदणी अभियानाची माहिती देत पात्र मतदारांची नोंदणी पूर्ण करण्यासाठी घराघरात जनजागृती करण्याचे आवाहन केले.

यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या रक्तदान शिबिराचे नियोजन करण्यात आले. तसेच शेतकरी कर्जमाफी, शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आणि जनहिताच्या प्रश्नांबाबतही चर्चा झाली.

बैठकीत आंबेगाव पूर्व मंडळाची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून संघटन विस्तार, बूथ सक्षमीकरण आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

बैठकीचे सूत्रसंचालन हर्षल सुतार यांनी केले.

यावेळी डॉ. ताराचंद कराळे, प्रियाताई पवार, प्रमोद बाणखेले, श्रीराम बांगर, संदीप भोंडवे, अविनाश बबरे, संदीप बाणखेले, मयूर भोर, श्रीकृष्ण देशमुख, जयसिंगराव एरंडे, अरविंद बबरे, मेजर निलेश जाधव, संजय रोंधळ, सोपन वायकर, मोहन सावंत यांच्यासह आंबेगाव पूर्व व चाकण मंडळातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीच्या शेवटी पदवीधर मतदार नोंदणी अभियान, रक्तदान शिबिर, संघटन बळकटीकरण आणि जनहिताच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Ad 1
Tags: Tejas Walunj
Previous Post

वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या विषबाधा प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी; बिरसा फायटर्सचे निवेदन

Next Post

घरकुल अनुदानाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचा इशारा; ५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा एल्गार

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
19
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
9
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
50
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
3
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

घरकुल अनुदानाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचा इशारा; ५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा एल्गार

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In