• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; दिलीप भोईर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 17, 2026
in Blog
0
0
SHARES
3
VIEWS
Ad 1

अलिबाग | प्रतिनिधी :

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य दिलीप भोईर (छोटम शेठ) यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकी जपत एक आगळावेगळा आदर्श निर्माण केला आहे. वाढदिवसानिमित्त पुष्पगुच्छ किंवा भेटवस्तूंऐवजी वह्या व शैक्षणिक साहित्य भेट द्या, असे आवाहन त्यांनी केले होते. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल ३५ हजार वह्या आणि मोठ्या प्रमाणात शैक्षणिक साहित्य भेट दिले.

RelatedPosts

अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका; लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

बोटकुळ परिसरात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

जमा झालेले साहित्य स्वतःकडे न ठेवता दिलीप भोईर यांनी अलिबाग तालुक्यातील २२० हून अधिक जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना वाटप करण्याचा उपक्रम राबविला. या उपक्रमामुळे अनेक गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा लाभ मिळाला.

साई क्रीडा मंडळाच्या पुढाकारातून तसेच सागर पाटील, विघ्नेश पाटील आणि नवीन पाटील यांच्या सहकार्याने भाकरवड येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही वह्या व शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला दिलीप भोईर (छोटम शेठ), नयन पाटील, राजेश पाटील, विशाल पाटील, शाळेतील शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या उपक्रमामुळे वाढदिवस सामाजिक उपयुक्ततेने साजरा करण्याचा प्रेरणादायी संदेश समाजात पोहोचला असून, विद्यार्थी आणि पालकांकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Tags: Nitin PAtil
Previous Post

बोटकुळ परिसरात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Next Post

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

Related Posts

Blog

अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका; लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

July 17, 2026
2
Blog

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

July 17, 2026
4
Blog

बोटकुळ परिसरात दमदार पावसाची हजेरी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

July 17, 2026
20
Blog

शिरूरमध्ये मोकाट कुत्र्यांविरोधात नगरपरिषदेची धडक मोहीम; नागरिकांना दिलासा

July 17, 2026
1
Blog

घरकुल अनुदानाच्या विलंबाविरोधात काँग्रेसचा इशारा; ५ ऑगस्टपासून आमरण उपोषणाचा एल्गार

July 17, 2026
7
Blog

आंबेगाव पूर्व व चाकण भाजप मंडळाची संयुक्त संघटनात्मक बैठक; नवीन कार्यकारिणी जाहीर, विविध विषयांवर चर्चा

July 17, 2026
2
Next Post

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

ताज्या बातम्या

अवकाळी पावसाचा केळी उत्पादकांना मोठा फटका; लाखोंचे नुकसान, मदतीची मागणी

July 17, 2026

ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; तरुणाचा मृत्यू, चालक गंभीर जखमी

July 17, 2026

वाढदिवसानिमित्त ३५ हजार वह्यांचे वाटप; दिलीप भोईर यांचा सामाजिक उपक्रम ठरला प्रेरणादायी

July 17, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In