
📰 सारथी महाराष्ट्राचा न्यूज | माढा | प्रतिनिधी :
माढा तालुक्यातील आढेगाव येथील कै. विठ्ठलराव शिंदे विद्यालयाचे मुख्याध्यापक मा. बंडू (जाधव) सर यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
शिक्षण क्षेत्रात भक्कम पाया रचत अनेक विद्यार्थ्यांना घडविण्याचे आणि त्यांना विविध शासकीय सेवांमध्ये यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करण्याचे मोलाचे कार्य जाधव सर यांनी केले आहे. त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून हा पुरस्कार जाहीर झाल्याने आढेगाव परिसरात आनंदाचे वातावरण आहे.
या यशाबद्दल आढेगाव ग्रामस्थ, माजी विद्यार्थी, पालक व शिक्षणप्रेमी नागरिकांनी जाधव सर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

