• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात अनुपस्थित? खुलासा न झाल्यास आंदोलनाचा इशारा

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
15
VIEWS
Ad 1

पत्रकार प्रतिनिधी :

वाई पंचायत समितीच्या पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी वारंवार कार्यालयात अनुपस्थित राहत असल्याचा आरोप करत पीपल्स रिपब्लिकन पार्टीने गटविकास अधिकाऱ्यांकडे निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे. याबाबत तातडीने खुलासा न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही पक्षाने दिला आहे.

RelatedPosts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे वाई तालुका अध्यक्ष विजय सातपुते यांनी सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे यांची भेट घेण्यासाठी कार्यालयात वारंवार जावे लागत आहे. मात्र, ते कार्यालयात उपलब्ध नसल्याचे आढळून येते. तसेच संपर्कासाठी दिलेला दूरध्वनी क्रमांकही लागत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे चौकशी केली असता अधिकाऱ्यांच्या उपस्थितीबाबत कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच कार्यालयात हालचाल नोंदवही (मुव्हमेंट रजिस्टर) उपलब्ध नसल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.

गटविकास अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीची नोंद तपासावी आणि आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत तातडीने खुलासा न झाल्यास पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) भाई जयदीप कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाध्यक्ष युवराज कांबळे, जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे यांच्या उपस्थितीत वेगळ्या स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा विजय सातपुते यांनी दिला.

यावेळी पक्षाचे सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई शहराध्यक्ष रणवीर परदेशी, तेजस कांबळे, युवक तालुकाध्यक्ष आकाश गायकवाड, जिल्हा संघटक विकास जाधव तसेच पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी; सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत श्रीगोंद्यात एकदिवसीय उपोषण

Next Post

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

Related Posts

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश
Blog

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
26
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)
Blog

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
11
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.
Blog

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026
4
Blog

दोन रेडे, दोन मासे : संत ज्ञानेश्वरांचा अभेदभावनेचा संदेश

September 1, 2026
5
बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर
Blog

बांबरुड राणीचे येथे कानबाई मातेचा उत्सव भक्तिमय अन् अति उत्साहात साजरा; वही गायनाने दुमदुमला परिसर

September 1, 2026
4
हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥
Blog

हर्दखळे ग्रामविकास मंडळ, मुंबई (ग्रामीण) यांच्या लढ्याला मोठे यश! 🔥

September 1, 2026
59
Next Post

मानवत तालुका व्हॉइस ऑफ मीडिया कार्यकारिणीची बिनविरोध निवड

ताज्या बातम्या

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

RTI अर्जाला उत्तर न दिल्याप्रकरणी ग्रामसेविकेवर कारवाईचे निर्देश

September 1, 2026
शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

शहादा महाविद्यालयात ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ उत्साहात साजरा (तरुणांनी मैदानी खेळांकडे वळावे –उपप्राचार्या कल्पना पटेल)

September 1, 2026
शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

शहादा येथे खुल्या जागेचे रूपांतर सुंदर ‘मिनी गार्डन’मध्ये; प्रा. मकरंद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कौतुकास्पद उपक्रम.

September 1, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In