• Login
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
No Result
View All Result
सारथी महाराष्ट्राचा न्यूज
No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्रातील विकासकामांचा सर्वंकष आढावा; आमदार विजय वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आमसभा संपन्न

Sarthi Maharashtracha by Sarthi Maharashtracha
July 18, 2026
in Blog
0
0
SHARES
17
VIEWS
Ad 1
Ad 1

ब्रम्हपुरी | प्रतिनिधी | दि. १३ जुलै २०२६

ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित तालुकास्तरीय आमसभेत विविध शासकीय विभागांच्या विकासकामांचा सर्वंकष आढावा घेण्यात आला. ग्रामपंचायत स्तरावरील प्रलंबित प्रश्न तातडीने निकाली काढून शासनाच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

RelatedPosts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. गट विकास अधिकारी तुषार दांडगे यांनी प्रास्ताविक करत मागील आमसभेतील निर्णयांच्या अनुपालनाचा अहवाल सादर केला. त्यानंतर तालुक्यात सुरू असलेल्या तसेच पूर्ण झालेल्या विकासकामांचा विभागनिहाय सविस्तर आढावा घेण्यात आला.

बैठकीत पाणीपुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम, एकात्मिक बाल विकास सेवा योजना, सिंचन, पंचायत राज, कृषी, आरोग्य, शिक्षण, राष्ट्रीय ग्रामीण जीवोन्नती अभियान, पशुसंवर्धन, ग्रामीण गृहनिर्माण (घरकुल), महावितरण, वन विभाग आदी विविध विभागांच्या योजनांची प्रगती, प्रलंबित कामे आणि अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला.

सरपंच, प्रशासक, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ प्रतिनिधींनी गावपातळीवरील विविध समस्या व विकासकामांबाबतच्या मागण्या मांडल्या. यावर आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना तातडीने कार्यवाही करून प्रश्न सोडविण्याचे निर्देश दिले. विकासकामांची गुणवत्ता, वेळेत पूर्तता, विभागांमधील समन्वय आणि शासनाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी खेमराज तिडके, डॉ. राजेश कांबडे, प्रमोद चिमुरकर, डॉ. थानेश्वर कायरकर, निलकंठ माणापुरे यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा परिषद व विविध शासकीय विभागांचे वरिष्ठ अधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, प्रकल्प संचालक मंजीरी टकले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुलकुमार गायकवाड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, कार्यकारी अभियंते, शिक्षणाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत लोकप्रतिनिधी, सरपंच, प्रशासक, ग्रामस्थ आणि विविध समितीच्या पदाधिकाऱ्यांनी विकासासंदर्भातील विधायक सूचना मांडल्या. या आमसभेमुळे विभागांमधील समन्वय वाढून प्रलंबित विकासकामांना गती मिळेल आणि शासनाच्या योजनांची अधिक प्रभावी अंमलबजावणी होईल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.

सभेचा समारोप सहाय्यक गट विकास अधिकारी रविंद्र घुबडे यांनी आभार प्रदर्शन करून केला.

Ad 1
Previous Post

‘एक झाड – एक जबाबदारी’ संकल्पनेतून ब्रम्हपुरी पोलीस वसाहतीत वृक्षारोपण; हरित भविष्याचा संकल्प

Next Post

कॅन्सरग्रस्त रुग्णाला आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

Related Posts

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण
Blog

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
34
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!
Blog

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
17
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.
Blog

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026
66
Blog

दि-13आक्टेबंर2026 लातूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीबाबत जिल्हाधिकारी महोदयांसोबत माजी मंत्री आमदार संभाजी भैय्या पाटील निलंगेकर यांची निलंगा विधानसभेतील सर्व लोकप्रतिनिधीसह महत्त्वपूर्ण बैठक संपन्न…!

October 16, 2026
4
नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
Blog

नवी मुंबईतील सानपाडा सेक्टर १७ मध्ये प्रस्तावित ऑर्केस्ट्रा बार आणि मद्य परवान्याविरोधात स्थानिक रहिवाशांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.

October 16, 2026
6
दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.
Blog

दिवाळी निमित्त शासनाने शिधा वाटप दुकानतून स्वत वस्तू चे वितरण करावे…. पत्रकार भारत कवितके यांची मागणी.

October 16, 2026
5
Next Post

कॅन्सरग्रस्त रुग्णाला आमदार विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याकडून आर्थिक मदतीचा हात

ताज्या बातम्या

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

माढा तालुक्यात चारा छावणी व पिण्याच्या पाण्यासाठी बालाजी बारबोले पाटील यांचे बेमुदत अन्नत्याग उपोषण

October 16, 2026
आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या टीचरपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!

October 16, 2026
रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

रक्तदान चळवळीला सेवाभावाची जोड देत गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचविण्याचे कार्य संतोष अबगुल प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू आहे.

October 16, 2026

Popular Stories

  • स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    स्त्री शक्ती प्रभाग संघात व सांजोबा ग्राम संघात मोठे गैरव्यवहार? दौंड तालुक्यातील २५०० महिलांचे गंभीर आरोप; दोषींवर कारवाई न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा.

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दौंड बोरीपारधी बोरमलनाथ मंदिरातील गुरव झाले हैवान देवस्थानच्या जमिनीवरून गुरव यांनी आपल्या बहिणीचे पाडले तीन दात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • येरंडोळ-बुजवडे रस्ता कामाचा अशोकअण्णा चराटी यांच्या हस्ते शुभारंभ; २५ लाखांचा निधी मंजूर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • खेड तालुक्यातील गडद गावामध्ये इश्काच चांदणं गाण्याचे चित्रीकरण पूर्ण..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एस.एस.सी.परीक्षा फेब्रुवारी/ मार्च 2026 आजरा नंबर 1 केंद्र 5301 केंद्राची तयारी पूर्ण.

    0 shares
    Share 0 Tweet 0
सारथी महाराष्ट्राचा न्यूज

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Navigate Site

  • शिक्षण
  • सरकारी योजना

Follow Us

No Result
View All Result
  • शिक्षण
  • सरकारी योजना
  • Login

© 2025 सारथी महाराष्ट्राचा न्यूज हे एक विश्वासार्ह व निष्पक्ष डिजिटल न्यूज पोर्टल आहे. समाजाच्या मूळ प्रश्नांना वाचा देणे, सत्यावर आधारित पत्रकारिता करणे आणि ग्रामीण व स्थानिक स्तरावरील बातम्या प्रभावीपणे मांडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In